आरोग्यासाठी बदाम खाणे अतिशय चांगले आहे, याबाबत काेणताही वाद नाही. पण तरीही कोणत्याही सुकामेव्याबाबत नसेल एवढे कनफ्युजन बदामबाबत आहे. बदाम भिजवून (proper method of eating almonds) खावेत की तसेच खायचे.. भिजवलेल्या बदामाची सालं काढायची की साल न काढता तसेच बदाम खायचे, किंवा दररोज किती बदाम खावे.. या सगळ्या बाबत नेहमीच अनेक लोकांच्या मनात शंका असतात. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आयुर्वेदतज्ज्ञ गीता वारा यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली आहेत.
बदाम भिजवून का खावेत (shall we eat soaked almonds?)बदाम हा प्रोटीन्सचा अतिशय उत्तम स्त्राेत आहे. त्यामुळे शरीरातली प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी भिजवलेले बदाम नियमितपणे खावेत, असा सल्ला डॉक्टर देतात. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याची क्षमताही बदामामध्ये आहे. तसेच बदामात ॲण्टी ऑक्सिडंट्सही मोठ्या प्रमाणात असतात. पण इतर कोणत्याही सुकामेव्यापेक्षा बदाम पचायला कठीण आहेत. त्यामुळे बदाम नेहमी भिजवूनच खावेत, असा सल्ला तज्ज्ञ देतात. ते भिजवून खाल्ल्यामुळे पचायला सोपे जातात.
बदामाची सालं काढायची की नाही...(remove the skin of soaked almonds?)अनेक जण रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी तसेच तोंडात टाकतात तर काही जण अगदी नेटाने बदामाची सगळी साले काढतात आणि मगच ती खातात... आयुर्वेदतज्ज्ञ असं सांगतात की बदामाच्या सालांमध्ये tannins and phytic acid या प्रकारची anti-nutrients असतात. जे पचायला कठीण असतात. याशिवाय हे घटक बदामातले पौष्टिक घटक शरीरात मिसळण्यास अडथळा आणतात. त्यामुळे मग अनेक जणांना पित्ताचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे भिजवलेले बदाम नेहमी सालं काढूनच खावीत. एक व्यक्ती ५ ते १० भिजवलेले बदाम दररोज सकाळी खाऊ शकते, अशी माहितीही डॉ. गीता वारा यांनी दिली.
भिजवलेले बदाम नियमितपणे खाण्याचे फायदे(Benefits of eating soaked almonds regularly)१. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात मोनो सॅच्युरेटेड फॅट्स असतात. ते शरीरातील बॅड कोलेस्टरॉल म्हणजेच LDL cholesterol कमी करण्यासाठी मदत करतात. २. बदामामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण अतिशय चांगले असते.३. रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम उपयुक्त आहेत.४. बदामामध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.५. बदामामध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, ओमेगा ३, ओमेगा ६, मॅग्नॅशियम, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक हे घटक मोठ्या प्रमाणावर असतात. ६. स्नायुंचा थकवा घालविण्यासाठी भिजवलेले बदाम खाणे उपयुक्त ठरते. ७. स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात खूप जास्त रक्तस्त्राव होत असल्यास त्यांनी महिनाभर नियमितपणे भिजवलेले बदाम खावेत.