Join us  

दिवसाला ६ हजार पाऊले चालूनही वजन कमीच होत नाही? तज्ज्ञ सांगतात त्यामागचं महत्त्वाचं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 2:23 PM

Why You Haven't Been Losing Weight With Walking वजन कमी करायचं म्हणून रोज चालत पाऊलं मोजताय, पण वजन कमीच होत नाही?

हेल्दी लाईफस्टाईल जगणे हे जणू अनेकांसाठी कठीण झाले आहे. ज्यामुळे मुख्य म्हणजे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. डब्ल्यूएचओच्या मते, संपूर्ण जगात सुमारे २ अब्ज लोकं लठ्ठपणाचे शिकार बनले आहेत. लठ्ठपणा हे अनेक आजारांचे कारण आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे मधुमेह, हृदयविकार, किडनी आणि यकृताचे आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तज्ज्ञ वजन कमी करण्याचा सल्ला देतात.

वजन कमी करण्यासाठी लोकं जिम, योगा, व डाएटवर लक्ष देतात. तर काही लोकं वॉक करतात. असे म्हणतात रोज ६ हजार पावलं चालल्याने लठ्ठपणासह अनेक आजार बरे होतात. पण काहींचे ६ हजार पावलं चालल्याने देखील वजन कमी होत नाही. असे का होते? या मागचं नक्की कारण काय? यासंदर्भात, सर गंगाराम हॉस्पिटलमधील इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड पॅन्क्रियाटिक बिलीरी सायन्सचे सल्लागार डॉ. श्रीहरी अनिखिंडी यांनी माहिती दिली आहे(Why You Haven't Been Losing Weight With Walking).

डॉक्टर अनिखिंडी यांच्या मते, ''वजन वाढण्यास प्रामुख्याने तीन कारणे जबाबदार आहेत. कॅलरीजयुक्त पदार्थ खाणे, व्यायाम टाळणे, पुरेशी झोप न घेणे. या चुकांमुळे वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी या चुका टाळणे गरजेचं आहे.''

हेल्दी डाएट

वजन वाढण्यामागे अनहेल्दी पदार्थ जबाबदार आहेत. अशा स्थितीत फास्ट फूड, जंक फूड म्हणजेच पिझ्झा, बर्गर, डेअरी प्रोडक्ट, व ज्या गोष्टींमध्ये कृत्रिम साखर आढळते ते खाणे बंद करा. त्याऐवजी पालेभाज्या, ताजी फळे खा. ज्यात प्रोटीनचा समावेश आहे, असे पदार्थ खा.

नाश्त्याला अजिबात खाऊ नयेत ४ पदार्थ, वजन वाढेल आणि पोटही बिघडेल कायमचं

ब्रिस्क व्यायाम

लठ्ठपणा कमी करण्यासाठी फक्त घाम येणे आवश्यक नाही. यासाठी ब्रिस्क व्यायाम करा. दररोज ४५ मिनिटे ते १ तास ब्रिस्क व्यायाम करा. जर आपण वॉक करत असाल तर, ब्रिस्क वॉक करा. ब्रिस्क वॉकऐवजी आपण जॉगिंग करत असाल तर, अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल. यासोबत सायकलिंग, स्विमिंग करा.

योगा

योगा केल्यानेही वजन कमी करता येते. जे लोकं खूप तणावाखाली राहतात, त्यांच्यासाठी योग खुप फायदेशीर ठरते. यासाठी मेडिटेशन करा.

स्त्रियांचं वजन भराभर आणि खूप का वाढतं? ७ कारणं, वाढत्या वजनासह आजारांचा धोका टाळा

पुरेशी झोप

वजन कमी करण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे. पुरेशी व शांत झोप मिळाल्यानंतर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो, यासह काम करण्याची उर्जा मिळते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स