Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > थंडीच्या दिवसांत बदाम खायला विसरू नका! वाचा बदाम खाण्याचे ७ जबरदस्त फायदे 

थंडीच्या दिवसांत बदाम खायला विसरू नका! वाचा बदाम खाण्याचे ७ जबरदस्त फायदे 

Health Benefits of Almonds: भरपूर फॅट्स असतात म्हणून बदाम खायला घाबरत असाल तर बदाम खाण्याचे हे काही फायदे तुम्ही वाचायलाच पाहिजेत. बघा याविषयी तज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 05:48 PM2022-11-21T17:48:52+5:302022-11-22T16:48:43+5:30

Health Benefits of Almonds: भरपूर फॅट्स असतात म्हणून बदाम खायला घाबरत असाल तर बदाम खाण्याचे हे काही फायदे तुम्ही वाचायलाच पाहिजेत. बघा याविषयी तज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत.

Winter Special Food: Why it is important to eat almond in winter season? Benefits of eating almonds | थंडीच्या दिवसांत बदाम खायला विसरू नका! वाचा बदाम खाण्याचे ७ जबरदस्त फायदे 

थंडीच्या दिवसांत बदाम खायला विसरू नका! वाचा बदाम खाण्याचे ७ जबरदस्त फायदे 

Highlights New England Journal of Medicine यांच्यातर्फे नुकतंच एक संशोधन करण्यात आलं असून त्यामध्ये दररोज किती बदाम खाल्ले पाहिजेत आणि त्याने काय लाभ होतात, याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

थंडीची हुडहुडी एकदा सुरू झाली की शरीराला आपोआपच गरज भासते ती शरीराला उबदार ठेवणाऱ्या अन्न पदार्थांची. म्हणूनच मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, सुकामेवा, गूळ, तूप असे पदार्थ हिवाळ्यात भरपूर प्रमाणात खायला पाहिजेत, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. या सगळ्या पदार्थांमध्ये बदाम खाणंही अतिशय महत्त्वाचं आहे (Why it is important to eat almond in winter season?). थंडीत बदाम खाणं का गरजेचं आहे, याविषयी New England Journal of Medicine यांच्यातर्फे नुकतंच एक संशोधन करण्यात आलं असून त्यामध्ये दररोज किती बदाम खाल्ले पाहिजेत आणि त्याने काय लाभ होतात, याविषयीची माहिती देण्यात आली आहे.(Benefits of eating almonds)

 

काय सांगतो अभ्यास?
New England Journal of Medicine यांच्या अभ्यासानुसार प्रौढ व्यक्तीने दिवसभरातून जवळपास २० बदाम खायला पाहिजेत, असं सांगितलं आहे. ते तुम्ही भिजवून खा किंवा भाजून त्याची पावडर करून ती दुधात किंवा अन्य पदार्थांमध्ये टाकूनही घेऊ शकता. 

गाजर- बीट- टोमॅटोचं चवदार गरमागरम सूप, थंडीमध्ये प्यायला हवंच.. बघा झटपट रेसिपी
1. त्यातून शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम, कॉपर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, रायबोफ्लेविन मिळतं. 
2. तसंच लोह, पोटॅशियम, झिंक, व्हिटॅमिन बी, थायमिन आणि फॉलेट यांचाही बदाम हा उत्तम स्त्रोत मानला जातो. 
3. बदामाला हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट्ससाठीचं उत्तम स्टोअर हाऊसही म्हणतात. 
4.  बदाम नियमित खाल्ल्याने कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह टाईप २ यांचा धोकाही कमी होत असल्याचं सांगितलं आहे.

 

बदाम खाण्याचे इतर फायदे
आहारतज्ज्ञ करिश्मा शाह यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना बदाम खाण्याचे पुढील फायदे सांगितले आहेत.
१. बदामामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील बॅड काेलेस्टरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

Wedding Special: पायावर काढण्यासाठी झटपट, सोप्या- आकर्षक मेहेंदी डिझाईन्स, बघा एक से एक सुंदर प्रकार

२. बदाममध्ये असणारे ॲण्टी ऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवून संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात.

३. तसेच रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासही बदाम फायदेशीर आहेत. 


 

Web Title: Winter Special Food: Why it is important to eat almond in winter season? Benefits of eating almonds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.