Join us

थंडीत करा अजिबात कडू न होणारे ‘मेथीचे लाडू’, पौष्टिक लाडू खा-हाडं होतील कायमची बळकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:05 IST

Winter Special Methi Laddu Recipe : मेथी आणि डिंकाचे लाडू कसे करायचे त्याची सोपी रेसिपी पाहूया.

हिवाळ्याच्या दिवसांत तब्येतीशी संबंधित समस्या वाढू लागतात. लोकांच्या शरीरात  वेदना जाणवतात तर काही लोकांना सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवते (Methi Laddu). अशा स्थितीत मेथीचे लाडू खाल्ल्यानं शरीराला एनर्जी मिळते आणि शरीराची गरमी टिकून राहते ज्यामुळे सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवत नाही. याशिवाय हे लाडू केसांसाठीही बरेच फायदेशीर ठरतात. मेथी आणि डिंकाचे लाडू कसे करायचे त्याची सोपी रेसिपी पाहूया. (Winter Special Methi Laddu Recipe)

मेथी आणि लिंकाचे लाडू उत्तर भारतातील एक लोकप्रिय पदार्थ आहेत. कारण थंडीचे वातावरण तिथे नेहमीच असते म्हणून हे लाडू बनवले जातात. (Winter Special Methi Laddu Easy Recipe) महाराष्ट्रातही थंडीच्या दिवसांत आवर्जून हे लाडू केले जातात. मेथीच्या लाडूत अळीव, डिंक, काजू, बदाम, पिस्ता, खोबरं असे बरेच पौष्टीक पदार्थ घातले जातात.

मेथीचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य 

१) मेथी- २ कप

२) डिंक- १ कप

३) गव्हाचं पीठ- २ कप

४) दळलेली साखर - १ कप

५) वेलची पावडर - अर्धा चमचा

६) सुका मेवा - अर्धी वाटी

मेथीच्या लाडूची रेसिपी (Health Immunity Booster Methi Ladoo Recipe)

१) मेथीचे दाणे वाटून ही पावडर हलक्या आचेवर भाजून घ्या. डिंक फुलेपर्यंत नीट भाजून घ्या मग थंड होऊ द्या. डिंक बारीक करून त्याची पावडर बनवून घ्या.

२) गव्हाचं भाजलेलं  पीठ आणि साखर व्यवस्थित मिसळा. नंतर यात तूप आणि साखर घालून मिसळून घ्या. वेलची पावडर आणि बारीक केलेला सुका मेवा घाला.  तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर  करू शकता. फक्त चिक्कीचा गूळ वापरू नका.

3) त्यात नारळाचं तेल, सुके मेवे हे मिसळा आणि मिश्रण गरम असतानाच छोटे छोटे लाडू वळून घ्या. हे लाडू एका बंद डब्यात घालून स्टोअर करा.

 मेथी आणि डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे

मेथीचे लाडू तब्येतीसाठी बरेच पौष्टीक असतात. यात फायबरर्स, प्रोटीन्स यांसारखी खनिजं असतात. याव्यतिरिक्त हे लाडू खाल्ल्यानं केसांची वाढ चांगली होते. शरीराला प्रोटीन मिळते. यामुळे मसल्स बिल्डींगसाठी फायदा होतो. याव्यतिरिक्त सर्दी, खोकल्यापासूनही आराम मिळतो. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स