Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कमी खा-उपाशी राहा, व्यायाम करा तरीही तुमचं वजन कमी होत नाही? असं का होत असेल..

कमी खा-उपाशी राहा, व्यायाम करा तरीही तुमचं वजन कमी होत नाही? असं का होत असेल..

World Obesity Day : Tips To Reduce Weight Control Diabetes & Fight Obesity : वाढलेलं वजन, लठ्ठपणा अनेक आजारांना आमंत्रण देतात, लठ्ठपणा कमी करण्यासाठी नेमकं करायचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2023 04:46 PM2023-03-04T16:46:00+5:302023-03-04T16:58:31+5:30

World Obesity Day : Tips To Reduce Weight Control Diabetes & Fight Obesity : वाढलेलं वजन, लठ्ठपणा अनेक आजारांना आमंत्रण देतात, लठ्ठपणा कमी करण्यासाठी नेमकं करायचं काय?

world obesity day : tips to reduce weight control diabetes and fight obesity. | कमी खा-उपाशी राहा, व्यायाम करा तरीही तुमचं वजन कमी होत नाही? असं का होत असेल..

कमी खा-उपाशी राहा, व्यायाम करा तरीही तुमचं वजन कमी होत नाही? असं का होत असेल..

अर्चना रायरीकर

वजन कमी करायचे असेल तर भरपूर व्यायाम करा आणि हवे तसे खा असे बऱ्याच जणांना वाटत असते. बरेचजण वर्षानूवर्षे व्यायाम करतात परंतु त्यांचे वजन काही हलत नाही. कित्येक लोक नियमित जीमला जातात पण त्यांचे वजन काही केल्या कमी होत नाही. जर योग्य वजन आणि योग्य फिटनेस हवा असेल तर उत्तम व्यायामाबरोबरच योग्य आहाराला पर्याय नाही हे लक्षात ठेवल पाहिजे. जागतिक लठ्ठपणा दिन (world obesity day) निमित्त आपण समजून घेऊया की लठ्ठपणा नेमका का वाढतो आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात.

व्यायामाने फिटनेस वाढतो, स्टेमिना वाढतो आणि शरीर चपळ होते हे खरे आहे तसे व्यायामाने वय वाढण्याची अर्थात वाढलेले वय कमी दिसण्याची आणि तरुण दिसण्याची संधी मिळत असते तसेच व्यायामाने मधुमेह आणि ह्रदयविकार असे आजार दूर राहतात. पण फक्त व्यायामाने फिटनेस वाढत राहिला तरी वजन कमी होईलच असे सरसकट होत नाही!
काही जणांचा खाण्यापिण्यावर बिलकुल ताबा नसतो आणि आपण जीमला जातच आहोत तर आपल्याला आहारावर नियंत्रण करण्याची काही गरज नाही असे त्यांचे ठाम मत असते. यामुळे वजन जैसे थे राहते.  सौ बात की एक बात व्यायाम केला तरी योग्य आहाराला पर्याय नाही(World Obesity Day : Tips To Reduce Weight Control Diabetes & Fight Obesity).

नक्की काय करायला हवं?
१. काही जण व्यायामाचा आळस करतात आणि असा विचार करतात की फक्त डाएट करू आणि व्यायामाला दांडी मारतात. अगदीच तुम्हाला पाठीचे, गुढग्याचे वगेरे दुखणे असेल, काही ऑपरेशन झाले असेल आणि डॉक्टर जर व्यायामाला नाहीच म्हणाले असतील तर फक्त आहारावर फोकस करण्या शिवाय पर्याय नसतो.
२. काही जण वेगवेगळ्या फॅड डाएटच्या नादी लागतात . 
३. खूप क्रॅश डाएट केले आणि व्यायामही केला नाही तर डाएट सोडले की वजन भरमसाठ वाढू शकतं. 
४. व्यायामाने वजन कमी होतेच पण योग्य आहाराने जे वजन कमी झालेले आहे ते तसेच राखण्याचे काम व्यायामामुळे होते . 
५. थोडक्यात वजन कमी करायचे झाल्यास व्यायाम आणि योग्य आहार हे दोन्ही हवे ! 
६. आमच्याकडील प्रॉडक्ट्स खा आणि व्यायाम करू नका, अगदी आरामात वजन कमी करा असे ऐकले की खरंच या प्रकारांची कीव करावीशी वाटते. 
७. आपण दोन वेळेला किंवा चार वेळेला खातो पण दिवसातून जर एकदाही शरीराने व्यायाम करण्याची तसदी जर आपण घेतली नाही तर त्यासारखे दुर्दैव नाही .

८. आपले पूर्वज ज्या पद्धतीने शरीराच्या हालचाली करत त्याच्या निम्म्याने हालचाली देखील आपण आत्ताचा काळात करू शकत नाही. आणि केवळ वजन कमी करण्यासाठीच म्हणून व्यायाम नाही तर बारीक, मध्यम आणि जाड लोक कोणीही असो प्रत्येकासाठीच व्यायाम आवश्यक आहे.
९. योग्य आहार आणि योग्य व्यायामाने शरीरातील चरबी कमी होते, स्नायू बळकट होतात नी हाडे मजबूत राहतात . 
१०. व्यायाम पूर्वी आणि व्यायामानंतर काय आणि किती खावे हे देखील महत्वाचे आहे आणि ते तुम्ही कुठला व्यायाम करता आणि त्याची तीव्रता कशी आहे यावरही अवलंबून आहे
११. वजन कमी करताना आहार नियंत्रण आणि व्यायाम दोन्ही क्रिया परस्पर पूरक अश्याच असतात.जर वजन कमी करायचे असेल तर ७०% आहार आणि ३० % व्यायाम आणि त्याच बरोबर १००% निर्धार या त्रिसुत्रींची गरज असते .      
१२. वजन कमी करताना आहारातून कॅलरी कमी करणे आणि व्यायामाद्वारे कॅलरी खर्च करणे या दोन्ही गोष्टींचा फायदा होतो.

१३. व्यायाम करूनही भूक लागलीच तर ती योग्य आहाराने कशी नियंत्रणात ठेवता येईल आणि दिवसातून दर दोन ते तीन तासांनी हलका आहार घेतल्याने भूक आटोक्यात राहील.
१४. तरीही भूक लागलीच तर काय खाल्ले तर चालेल याचे मार्गदर्शन आहार तज्ज्ञ योग्य प्रकारे आपल्याला करतात. योग्य आहाराने भूक नियंत्रणात राहते, व्यायाम करायला उत्साह वाटतो आणि थकवा जाणवणे किंवा केस गळणे असे दुष्परिणाम जाणवत नाहीत.
१५.  अश्याप्रकारे योग्य आहार आणि योग्य व्यायाम याचा सुंदर समन्वय साधता आला तर आरोग्याला खूप छान बळकटी मिळेल आणि वजन कमी होऊन ते कायम नियंत्रणात राहील.  

(लेखिका आहारतज्ज्ञ, डायबिटिक एज्युकेटर आणि सत्व न्यूट्रिशन सेंटरच्या संचालक आहेत.)

Web Title: world obesity day : tips to reduce weight control diabetes and fight obesity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.