Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दिवाळीत फराळ करताना सतत वजन वाढण्याची चिंता? ५ गोष्टी लक्षात ठेवा आणि एन्जॉय दिवाळी बिंधास्त

दिवाळीत फराळ करताना सतत वजन वाढण्याची चिंता? ५ गोष्टी लक्षात ठेवा आणि एन्जॉय दिवाळी बिंधास्त

Weight Control During Diwali: अशी अडचण अनेकांची होते. फराळाचे वेगवेगळे पदार्थ पाहून ते खूप खावेसे वाटतात. पण त्यामुळे वजन वाढेल की काय, याची चिंता सतत भेडसावते. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2022 08:44 AM2022-10-23T08:44:29+5:302022-10-23T08:45:01+5:30

Weight Control During Diwali: अशी अडचण अनेकांची होते. फराळाचे वेगवेगळे पदार्थ पाहून ते खूप खावेसे वाटतात. पण त्यामुळे वजन वाढेल की काय, याची चिंता सतत भेडसावते. 

Worried about weight gain during diwali? 5 tips How to control weight during diwali  | दिवाळीत फराळ करताना सतत वजन वाढण्याची चिंता? ५ गोष्टी लक्षात ठेवा आणि एन्जॉय दिवाळी बिंधास्त

दिवाळीत फराळ करताना सतत वजन वाढण्याची चिंता? ५ गोष्टी लक्षात ठेवा आणि एन्जॉय दिवाळी बिंधास्त

Highlightsदिवाळीच्या दिवसांत पाणी भरपूर प्या. लिक्विड भरपूर प्या. त्यामुळे तळलेले पदार्थ खाल्ल्याचा आरोग्यावर किंवा त्वचेवर परिणाम होणार नाही. 

दिवाळीचे ४ दिवस म्हणजे जिभेचे भरपूर लाड आणि पोटावर मात्र अत्याचार, असा काही प्रकार असतो. कारण एकतर घरी पाहुणे आलेले असतात किंवा मग आपण कुणाकडे तरी पाहुणे म्हणून गेलेलो असतो. या दोन्ही प्रकारांमध्ये मग भरपूर जेवण तर होतच, पण फराळाच्या तेलकट, तुपकट, गोड पदार्थांवरही यथेच्छ ताव मारला जातो. त्याचा व्हायचा तोच परिणाम होतो आणि मग मोठ्या प्रयत्नांनी आटोक्यात आणलेला वजनाचा काटा पुन्हा एकदा झर्रकन वर जातो. असं होऊ नये, फराळाचाही मनसोक्त  आनंद घेता यावा आणि वजनही आटोक्यात रहावे, यासाठी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी काही टिप्स दिल्या आहेत. 

 

फराळ करून वजन वाढू नये, यासाठी...
१. दिवाळीचा फराळ शक्यतो घरीच बनवलेला असावा. विकतचा फराळ तळताना त्याच त्या तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केलेला असतो. त्यामुळे वजन वाढण्याची तसेच इतर आजार होण्याची शक्यता जास्त असते.

फक्त 3 पदार्थ आणि चवदार कलाकंद तयार, बघा सोपी- झटपट रेसिपी

२. फराळाला बसतो तेव्हा एखादा पदार्थ आवडला म्हणून आपण तो भरपूर खातो. त्याच्या जोडीने बाकीचे पदार्थही खातो. हे खाताना अनेक जणांना आपण किती खातो, आहोत हेच लक्षात येत नाही. त्यामुळे फराळ करताना कोणता पदार्थ किती खात आहात, याच्याकडे लक्ष ठेवा. प्रमाणात खा.

 

३. जेव्हा कुणाकडे फराळाला किंवा जेवणाला जाणार असाल, तेव्हा त्याच्या आधी शक्यतो डाएटिंग करा. घरीही खायचं, बाहेर जाऊनही खायचं, हे खूपच हेवी होतं. 

कतरिना कैफचा दिवाळी लूक व्हायरल, ७० हजारांच्या चमचमत्या लाल साडीमध्ये दिसतेय कमाल

४. गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा. जेवायला बसल्यावर सगळ्यात आधी भाज्या, सलाड जास्तीतजास्त खाण्यावर भर द्या. त्यानंतर मग तळलेले आणि गोड पदार्थ खा.

५. दिवाळीच्या दिवसांत पाणी भरपूर प्या. लिक्विड भरपूर प्या. त्यामुळे तळलेले पदार्थ खाल्ल्याचा आरोग्यावर किंवा त्वचेवर परिणाम होणार नाही. 


 

Web Title: Worried about weight gain during diwali? 5 tips How to control weight during diwali 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.