Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट, कंबरेची चरबी फारच सुटली? रामदेव बाबांचे खास उपाय; स्लिम पोट-दिसेल मेंटेन फिगर

पोट, कंबरेची चरबी फारच सुटली? रामदेव बाबांचे खास उपाय; स्लिम पोट-दिसेल मेंटेन फिगर

Yog guru Baba Ramdev Weight Loss : एक्सपर्ट्सनी सांगितलेले ३ सोपे उपाय वजन कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 01:19 PM2023-06-18T13:19:49+5:302023-06-18T16:05:02+5:30

Yog guru Baba Ramdev Weight Loss : एक्सपर्ट्सनी सांगितलेले ३ सोपे उपाय वजन कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतात

Yog guru Baba Ramdev Weight Loss : Best Yoga Poses and Tips for Weight Loss & Flat Stomach | पोट, कंबरेची चरबी फारच सुटली? रामदेव बाबांचे खास उपाय; स्लिम पोट-दिसेल मेंटेन फिगर

पोट, कंबरेची चरबी फारच सुटली? रामदेव बाबांचे खास उपाय; स्लिम पोट-दिसेल मेंटेन फिगर

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात पण लवकर परीणाम दिसून येत नाहीत. वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट आणि नियमित रूटीन ठेवणं फार गरजेचं असतं. (How to lose weight faster) असं पाहिलं जातं की वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले बरेच लोक वेट लॉसच्या प्रवासात काही चुका करतात यामुळे त्याचं वजन कमी करणं कठीण होतं. मेटाबॉलिझ्म स्लो झाल्यानंतर वजन कमी करणं कठीण होतं. (Yog guru Baba Ramdev Weight Loss)

अशात मेटाबॉलिझ्म वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.खाण्यापिण्याच्या वेळा, लाईफस्टाईल, झोपेच्या वेळा याकडे लक्ष द्यायला हवं. (Weight Loss & Flat Stomach) एक्सपर्ट्सनी सांगितलेले ३ सोपे उपाय वजन कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतात.  तसंच योगगुरू बाबा रामदेव यांनी वजन कमी करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. (Yog guru Baba Ramdev Shares a weight loss tips)

वजन कमी कमी होत  नाही

अनेकदा प्रयत्न करूनही तुमचं वजन कमी होत नसेल तर याचं कारण इंसुलिन हार्मोन असू शकतं. वजन वाढणं आणि पोटावरचं फॅट सुटणं यामागचं कारण इंसुलिन हार्मोन्सची  कमतरता असू शकतं. जेव्हा शरीरात इंसुलिन हार्मोनचं प्रमाण वाढतं.  तेव्हा शरीरातील बॉडी फॅट डिपॉजिशन मोडमध्ये असते. म्हणजेच वजन कमी करण्यास अडचण येते.

एपल सायडर व्हिनेगर

वजन कमी करण्यासाठी इन्सुलिन संवेदनशीलता आवश्यक आहे आणि सफरचंद सायडर व्हिनेगर इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते. हे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करते. तज्ज्ञांच्या मते, 1 चमचे एपल सायडर व्हिनेगर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या 30 मिनिटे आधी 1 ग्लास पाण्यात घ्या.

जेवल्यानंतर वॉक करणं

मॉर्निंग वॉक हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. पण त्याचवेळी जेवल्यानंतरही चालायला हवे. चालणे  शरीराची ग्लुकोज कार्यक्षमतेने वापरण्याची क्षमता वाढवते आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. याशिवाय रात्री जेवल्यानंतर चालल्यानं पचनक्रियाही चांगली राहते आणि झोप चांगली येते.

ओमेगा ३ सप्लिमेंट्स

ओमेगा-३ समृध्द अन्न वजन कमी करण्यासाठी चांगले मानले जाते. हे जळजळ कमी करून इंसुलिन संवेदनशीलता सुधारते. फ्लेक्ससीड्स, सोयाबीन, चिया बिया आणि सोयाबीनमध्ये ओमेगा ३ भरपूर प्रमाणात असते. याशिवाय रात्रीच्या जेवणानंतर ओमेगा ३ सप्लिमेंट्सही घेता येतात.

योगासनं

नियमित योगासनं केल्यानं स्नायूंची कार्यक्षमता वाढते. वजन नियंत्रणात राहतं आणि पाठदुखी, कंबरदुखीचे त्रास जाणवत नाही. वजन कमी होणं सहज शक्य होतं.  रोज स्वत:साठी अर्धा तास काढून योगासनं करायला हवीत.

Web Title: Yog guru Baba Ramdev Weight Loss : Best Yoga Poses and Tips for Weight Loss & Flat Stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.