Join us  

'असा' चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतील जबरदस्त फायदे, चहा करताना आणि पिताना फक्त १ गोष्ट लक्षात ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2023 12:39 PM

Proper Method Of Making Tea According To Ayurveda: चहा करताना आणि पिताना फक्त ही एकेक गोष्ट लक्षात ठेवा. बघा तुमचा नेहमीचाच चहा कसा आरोग्यदायी होतो ते......`

ठळक मुद्देचहा करताना आणि पिताना जर या काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर मग चहातले पौष्टिक गुणधर्म आणखी वाढतात.

दिवस उजाडला की सगळ्यात आधी आपल्याला समोर पाहिजे तो गरमागरम वाफाळत्या कडक चहाचा कप. सकाळी उठल्यावर आपल्या हातात जर आपल्या आवडत्या चवीचा चहा मिळाला तर मग सगळा दिवस कसा झकास जातो. चहा जर मनासारखा मिळाला नाही, तर मात्र अख्खा दिवस बोअर होऊन जातो. इतके आपण चहावर अवलंबून आहोत. योग्य प्रमाण राखून जर आपण चहा घेत असू तर तो आरोग्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरतो (How to make tea more healthy?). पण चहा करताना आणि पिताना जर या काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर मग चहातले पौष्टिक गुणधर्म आणखी वाढतात (chay making tips). असा आरोग्यासाठी पोषक ठरणारा चहा कसा करायचा आणि कसा प्यायचा ते आता पाहूया (Proper Method Of Making Tea)...

 

चहा करताना आणि चहा पिताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, याविषयीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या dt.lavleen या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

‘करु नकोस’ असं म्हंटलं की मुलं मुद्दाम तीच गोष्ट करतात? बघा काय केलं तर मुलं शहाण्यासारखं ऐकतील

यामध्ये असं सांगितलं आहे की उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असा कोणताही ऋतू असला तरी चहा पिण्याबाबतीत ही २ पथ्ये पाळलीच पाहिजेत. यात चहा पितानाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चहा कधीही रिकाम्या पोटी पिऊ नये. कारण पोट रिकामं असताना रात्रभर त्यात अनेक एन्झाईम्स तयार झालेले असतात. अशावेळी जेव्हा आपण चहा पितो, तेव्हा तो त्या एन्झाईम्ससाठी मारक ठरतो आणि त्यामुळे कॉन्स्टीपेशन, ॲसिडिटी असे त्रास होतात. त्यामुळे चहा घेण्याच्या आधी काहीतरी पोटात टाका आणि मगच चहा प्या.

 

चहा कसा करावा?

बहुतांश सगळ्याच घरांमध्ये चहा चुकीच्या पद्धतीने केला जातो. म्हणजेच चहाचं आधण उकळलं की त्यात दूध टाकलं जातं आणि दोन्ही एकत्र उकळलं जातं. ही पद्धत अतिशय चुकीची आहे.

कोण म्हणतं जवसाची चटणी खमंग होत नाही? १ सोपी रेसिपी, हिवाळ्यात ताटात हवीच जवसाची पौष्टिक चटणी 

योग्य पद्धतीनुसार आधी चहाचं पाणी एका भांड्यात उकळायला ठेवा. त्यात चहा पावडर आणि इतर मसाले म्हणजे आलं, तुळस, गवती चहा किंवा तुम्हाला इतर जे काही टाकायचं असेल ते टाका आणि तो चहा कपात गाळून घ्या. नंतर त्यात वरून गरम दूध टाका. असा चहा अधिक आरोग्यदायी मानला जातो. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती