झिंक हे एक पोषक तत्व आहे जे मानवी शरीरातील अनेक महत्वाच्या भूमिकांसाठी आवश्यक असते. सध्या सुरू असलेल्या साथीच्या रोगात, चांगल्या आरोग्यासाठी निरोगी खाण्याचे महत्त्व पुरेसे वाढले आहे. झिंकचा समावेश असलेले पौष्टिक पदार्थ आपल्या आहाराचा भाग असायला हवेत. रोगप्रतिकारक पेशींच्या विकास आणि कार्यामध्ये हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आपली रोगप्रतिकार शक्ती निरोगी ठेवण्याव्यतिरिक्त, झिंक निरोगी चयापचय क्रिया सुनिश्चित करते, जखमेच्या उपचारांना प्रोत्साहित करते, मुरुमांना प्रतिबंध करते.
सामान्यत: असे मानले जाते की शाकाहारी लोकांमध्ये झिंकच्या कमतरतेचे उच्च धोका असतात. तथापि, न्यूट्रिशनिस्ट लव्हनीत बत्रा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये याबाबत अधिक माहिती दिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून, त्यांनी सहजपणे उपलब्ध असणारे पोषक घटकांनी उपयुक्त असे पदार्थ शेअर केले आहेत. झिंक हा एक पौष्टिक पदार्थ आहे जो लोकांना निरोगी ठेवण्यासाठी , रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यासाठी फायदेशीर ठरतो. शरीरात प्रथिने आणि डीएनए तयार करण्यासाठी झिंक देखील आवश्यक आहे.
बाजरी
पोषणतज्ञ बाजरीला परवडणारे परंतु अत्यधिक पौष्टिक म्हणून वर्णन करतात जे आपल्या आहारात अनेक मार्गांनी वापरले जाऊ शकते. बाजरी भाकरीच्या स्वरूपात किंवा पेजेच्या स्वरूपात खाल्ली जाऊ शकते. हे आपल्याला प्रथिने, फायबर आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देऊ शकते. बाजरीच्या सेवनानं शरीरातील झिंगची कमरता पूर्ण होऊ शकते.
पनीर
पनीर प्रथिनांचे एक मुख्य स्त्रोत आहे. यालाच कॉटेज चीज असंही म्हणतात. एरवी चीज खाणं आरोग्यासाठी फायदेशीर नसतं. पण प्रथिनंयुक्त आणि कमी उष्मांक असलेलं पनीर खाणं वजन कमी करण्यासाठी उतम पर्याय आहे. पनीरच्या सेवनातून शरीरास आवश्यक कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम ही खनिजंही मिळतात. शिवाय ते घरीही सहज बनवता येतं. नाष्याला किंवा दुपारच्या जेवणाला तुम्ही पनीरच्या विविध पदार्थांचा आहार समावेश करू शकता.
तीळ
तिळामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, बी कॉम्प्लेक्स, मिनरल्स, मॅग्नेशिअम, आयर्न, झिंक आणि कॉपरसह अनेक खनिजे असतात. तीळ खाल्ल्याने मेंदूची ताकद वाढण्यास मदत होते. यातील लिपोफोलिक अँटीआॅक्सिडंट आपल्या मेंदूवर वाढत्या वयाचा परिणाम होऊ देत नाही. वृद्धापकाळात स्मरणशक्ती कमी होत जाते. त्यामुळे तिळाचे रोज सेवन केल्यास मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
सौंदर्य उपायातही तिळाचा वापर केला जातो, आंघोळीपूर्वी तिळाचे तेल लावल्यास त्वचा फुटण्याचे प्रमाण कमी होते. तिळातील स्निग्धपणा त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवतो. तर तिळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअमसारख्या तत्त्वामुळे हाडे मजबूत होतात. दिवसात एक चमचा तीळ खाल्ल्यास दात मजबूत होतात. तिळात फायबर आणि अॅँटीआॅक्सिडंट असल्याने प्रतिकारक्षमता वाढते, तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढत नाही.
चण्याची डाळ
या डाळीत फायबर्स मोठ्या प्रमाणावर असतात. तसंच डाळींचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. परीणामी डाळींचा आहार डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर असतात. डाळ खाल्ल्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित राहते. त्यासोबतच याने ब्लडमधील इन्सुलिन आणि ग्लूकोजची लेव्हलही नियंत्रणात ठेवते. वजन कमी करण्यासाठी तेलकट आहार न घेता जर तुम्ही डाळींचे सेवन केले तर शरीरासाठी फायदेशीर ठरेल. डाळींमध्ये आर्यन मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे हृदय निरोगी राहण्यासाठी डाळींचा आहार फायदेशीर ठरत असतो.
राजगिरा
शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे, कॅल्शिअम आणि आयर्नचा उत्तम स्त्रोत आहे. याव्यतिरिक्त राजगिऱ्यामध्ये मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम यांसारखी आवश्यक तत्वही असतात. राजगिऱ्याच्या लाह्या पचण्यास अत्यंत हलक्या आणि शरीरासाठी पौष्टिक असतात. राजगिऱ्यापासून धिरडी, थालिपीठं, डोसे, उपमा असे पदार्थही तयार करण्यात येतात.
राजगिऱ्यामध्ये इतर धान्यांच्या तुलनेत तीन पटिंनी अधिक कॅल्शिअम असतं. त्यामुळे याचा डाएटमध्ये समावेश केल्याने हाडं मजबुत होण्यास मदत होते. तसेच ऑस्टियोपोरोसिस यांसारख्या समस्या बळावण्याचा धोका कमी होतो. नियमितपणे राजगिऱ्याचा आहारात सामवेश केल्याने केसांच्या समस्या दूर होतात.
यामध्ये मुबलक प्रमाणात लायसिन असतं, जे केस दाट आणि मजबुत करण्यासाठी मदत करतं. तसेच यामध्ये सिस्टीनही असतं, जे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतं. याशिवाय राजगिऱ्याच्या बियांमध्ये फायटोस्टरोल असतं, जे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी मदत करतं. तसेच हे शरीरामधील शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवतं आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करतं.