बापूसाहेब शिंदे पतसंस्थेचा १० टक्के लाभांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:37+5:302021-09-25T04:26:37+5:30
आष्टा : येथील बापूसाहेब शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे मार्गदर्शक ...
आष्टा : येथील बापूसाहेब शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे मार्गदर्शक व राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे यांनी २७ व्या वार्षिक सभेत दिली
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाराम जाकलेकर, आनंदराव खोत, भगवान काळे, बाबासाहेब नायकवडी, बाबासाहेब शेळके, पंडित माळी, विजय मोरे, भगवान पवार, विश्वास टोमके, सरोजिनी शिंदे, विजया शेटे, जगन्नाथ बसुगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाराम जाकलेकर म्हणाले, संस्थेच्या ठेवी १२ कोटी, कर्जे ९ कोटी ५० लाख, गुंतवणूक ४ कोटी, कर्जवसुली ९९.५ टक्के असून एनपीए शून्य टक्के आहे. संस्थेला सतत ‘अ’ वर्ग मिळाला आहे. संस्था स्व-मालकीच्या इमारतीत कार्यरत असून सर्व कामकाज संगणकीकृत असून लॉकर सुविधा उपलब्ध आहे.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर उपाध्यक्ष अमित कदम यांनी अहवालवाचन केले, तर संस्थेचे सचिव नियाजुलहक नायकवडी यांनी विषयवाचन केले. तानाजी हेगडे यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब नायकवडी यांनी आभार मानले.
फोटो :
ओळ : आष्टा येथील बापूसाहेब शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत विराज शिंदे यांनी मार्गदर्शन केेले. यावेळी अध्यक्ष राजाराम जाकलेकर, उपाध्यक्ष अमित कदम, नियाजुलहक नायकवडी उपस्थित हाेते.