वाकुर्डे बुद्रुक योजनेस १०० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:07 AM2021-01-13T05:07:07+5:302021-01-13T05:07:07+5:30

वशी (ता. वाळवा) येथे भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश व गंजीखाना ते लवंद्रीमाता मंदिर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमात ...

100 crore fund for Wakurde Budruk scheme | वाकुर्डे बुद्रुक योजनेस १०० कोटींचा निधी

वाकुर्डे बुद्रुक योजनेस १०० कोटींचा निधी

Next

वशी (ता. वाळवा) येथे भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश व गंजीखाना ते लवंद्रीमाता मंदिर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य संजीव पाटील, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील प्रामुख उपस्थित होते.

भाजपचे सतीश पाटील, सरपंच जयश्री पाटील, उद्योजक उल्हास पाटील, शेतकरी दूध संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील, वॉलस्टार टेक्नॉलॉजीचे संस्थापक प्रताप पाटील यांनी सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. जयंत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

जयंत पाटील म्हणाले, आपण ज्यांच्या बरोबर काम केले, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. मात्र, केवळ बोलून चालत नाही, काम दाखवावे लागते. मानसिंगभाऊंनी गेल्यावेळी जसे काम केले, तसेच काम ते यावेळीही करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकशाही आहे. लोकांच्या हिताला प्राधान्य देत सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे.

आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, येत्या मार्चपर्यंत आपल्या गावातील ग्राम सचिवालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करू. जुना-नवा असा भेद न ठेवता एकोप्याने गावाचा विकास पुढे नेऊ या. आम्ही पूर्ण सहकार्य करू.

यावेळी प्रशांत पाटील, दत्ताजी पाटील, शिवाजी साळुंखे, पी.टी. पाटील, रूपाली भोसले, व्ही.एन. पाटील, सी.व्ही. पाटील आदी उपस्थित होते.

फोटो-१०वशी१

फोटो ओळी-

वशी (ता. वाळवा) येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. मंत्री जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार मानसिंगभाऊ नाईक, पी.आर. पाटील, सतीश पाटील, सरपंच जयश्री पाटील, प्रताप पाटील, विजयबापू पाटील, संजीव पाटील उपस्थित होते.

Web Title: 100 crore fund for Wakurde Budruk scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.