सोन्याळात आदेशाचा भंग केल्याने ११ दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:27 AM2021-05-18T04:27:12+5:302021-05-18T04:27:12+5:30
संख : सोन्याळ (ता. जत) येथे संचारबंदी आदेशाचा भंग केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समिती व उमदी पोलिसांनी ११ दुकाने ...
संख : सोन्याळ (ता. जत) येथे संचारबंदी आदेशाचा भंग केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समिती व उमदी पोलिसांनी ११ दुकाने सील केली. उमदी येथील किराणा दुकान मालकावर १० हजाराच्या दंडाची कारवाई केली.
जिल्ह्यात अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. सोन्याळ येथे दुकानदारांनी आदेशाचा भंग केल्यामुळे उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व आपत्ती व्यवस्थापन समितीने ११ दुकाने सील केली.
त्यामध्ये गुरुराज पुजारी मोबाईल शॉपी, रसूल दस्तगीर नदाफ किराणा दुकान, गुरु निंगाप्पा मुचंडी मोबाईल शॉपी, मल्लिकार्जुन निवर्गी किराणा दुकान, महबूब साहेबलाल नदाफ किराणा दुकान, खुतबुद्दिन जमाल नदाफ किराणा दुकान, सोमनिंग बसवंत पुजारी कृषी सेवा केंद्र, गुरुसिद्ध धुळा बिराजदार किराणा दुकान, लिंबू रमणा परीट हॉटेल भारत, जैनुद्दीन दस्तगीर नदाफ किराणा दुकान, दऱ्याप्पा नागप्पा कांबळे किराणा दुकान यांचा समावेश आहे.
उमदीतील किराणा दुकानदार गुरुनिंगाप्पा रामाप्पा होनोर याला किराणा दुकान चालू ठेवल्याबद्दल १० हजार रुपयाचा दंड केला.
कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांनी कारवाईत भाग घेतला.
फोटो ओळ : सोन्याळ (ता. जत) येथे संचारबंदी आदेशाचा भंग केल्याने आपत्ती व्यवस्थापन व उमदी पोलिसांनी ११ दुकाने सील केली.