सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून शुक्रवारी दिवसभरात १४७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. गेल्या १० दिवसांतील दिलासादायक बाब म्हणजे ८६ इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, मिरजेतील एकाचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच, चिंताजनक रूग्णांचीही संख्या वाढत आहे. महापालिका क्षेत्रासह वाळवा, आटपाडी, खानापूर आणि जत तालुक्यांतील वाढती रुग्णसंख्याही चिंता वाढविणारी ठरत आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआरअंतर्गत १०८३ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात १०९ जण बाधित आढळले आहेत. तर, रॅपिड ॲण्टिजेनच्या १०७६ चाचण्यांमधून ४७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४९९ वर पोहोचली असून त्यातील १०० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ९१ जण ऑक्सिजनवर तर नऊ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी तीनसह सातारा, जळगाव आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी एक कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ५०,५४०
उपचार घेत असलेले १४९९
कोरोनामुक्त झालेले ४७,२६०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७८१
शुक्रवारी दिवसभरात
सांगली ३३
मिरज २०
जत १६
खानापूर १२
वाळवा, तासगाव प्रत्येकी ११
आटपाडी १०
पलूस ८
कडेगाव, कवठेमहांकाळ प्रत्येकी ७
शिराळा १.