जतला दलित वस्ती योजनेतून दीड कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:43+5:302021-09-25T04:26:43+5:30

प्रभाग एकमध्ये एकूण १३ कामे मंजूर करण्यात आली आहेत. यात रूपेश कांबळे घर ते वाघमोडे घर ट्रीमिक्स काँक्रिटीकरण १५ ...

1.5 crore sanctioned from Jatla Dalit Vasti Yojana | जतला दलित वस्ती योजनेतून दीड कोटी मंजूर

जतला दलित वस्ती योजनेतून दीड कोटी मंजूर

Next

प्रभाग एकमध्ये एकूण १३ कामे मंजूर करण्यात आली आहेत. यात रूपेश कांबळे घर ते वाघमोडे घर ट्रीमिक्स काँक्रिटीकरण १५ लाख ६ हजार २०३ रुपये, माने घर ते होनमोरे घर ट्रीमिक्स रस्ता करणे ८ लाख २२ हजार, सुनील शिंदे घर ते चंदनशिवे घर ट्रीमिक्स काँक्रिटीकरण २ लाख ५६ हजार रुपये, संदीप मोरे घर ते दत्ता बुरुटे घर गटार काम १२ लाख ३ हजार रुपये, संजय कोळी घर ते बाळू संकपाळ घर ट्रीमिक्स रस्ता करणे १७ लाख ५३ हजार रुपये यासह इतर कामे मंजूर झाली आहेत.

या कामांसाठी आमदार विक्रम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून ही कामे मंजूर झाली आहेत. यापूर्वीही नगरसेविका साळे यांनी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत चार कोटींची कामे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

240921\img_20210924_123814.jpg

दलित वस्तीमधून दीड कोटींची कामे मंजूर : नगरसेविका साळे

Web Title: 1.5 crore sanctioned from Jatla Dalit Vasti Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.