सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवे १६३ रुग्ण आढळून आले, तर सहाजणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २०९ जण कोरोनामुक्त झाले.
मंगळवारी महापालिका क्षेत्रात ४० रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत ३७, मिरजेत तीन रुग्णांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यात १९, जत १६, कडेगाव ०७, कवठेमहांकाळ ०९, खानापूर १४, मिरज २१, पलूस ०५, शिराळा ०६, तासगाव ०९, वाळवा १७, तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, रायगड येथील सात रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत. दिवसभरात जिल्ह्यातील सहाजणांचा मृत्यू झाला. त्यात कडेगाव, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी १, तर खानापूर तालुक्यातील चार रुग्णांचा समावेश आहे. सध्या ३७७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरटीपीसीआरच्या २६०० चाचण्यांत ८० पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ३८९३ चाचण्यांत ९० रुग्ण सापडले.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,९७,३२३
कोरोनामुक्त झालेले : १,९१,०४८
आतापर्यंतचे मृत्यू : ५२२१
उपचाराखालील रुग्ण : १०५४
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
सांगली ३७
मिरज ३
आटपाडी १९
जत १६
कडेगाव ०७
कवठेमहांकाळ ०९
खानापूर १४
मिरज २१
पलूस ०५
शिराळा ०६
तासगाव ०९
वाळवा १७