चार महिन्यांत दस्त नोंदणीतून २७00 कोटींचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 04:44 AM2020-07-26T04:44:01+5:302020-07-26T04:44:16+5:30

दोन लाख ८२ हजार दस्तांची नोंदणी; कार्यालयात कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती

2700 crore revenue from diarrhea registration in four months | चार महिन्यांत दस्त नोंदणीतून २७00 कोटींचा महसूल

चार महिन्यांत दस्त नोंदणीतून २७00 कोटींचा महसूल

Next

महालिंग सलगर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनामुळे बंद असलेली दुय्यम निबंधक कार्यालये पुन्हा सुरू झाल्यानंतर एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत राज्यातील साडेपाचशे दुय्यम निबंधक कार्यालयांतून २ लाख ८२ हजार दस्तांची नोंदणी झाली असून २,७११.६९ कोटींचा महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क स्वरूपात शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
जुलैच्या सुरुवातीस सर्वप्रकारच्या दस्तांची नोंदणी सुरू झाल्यापासूनच्या कालावधीतही चांगली नोंदणी झाली. कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के उपस्थितीचे आदेश असतानाही शंभर टक्के उपस्थिती ठेवत नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी महसूलवाढीला हातभार लावला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई या शहरांना वगळून पहिल्या टप्प्यात बुलडाणा, नागपूर ग्रामीण, वर्धा, वाशिम, उस्मानाबाद आणि सांगली या सहा जिल्ह्यांत रेड झोन वगळून एप्रिल महिन्यात दस्त नोंदणी सुरू केली होती. पहिल्याच दिवशी सहा जिल्ह्यांत चोवीस दस्तांची नोंदणी होऊन पाच लाखांचा महसूल मिळाला.
वाढत्या महसुलाचा विचार करून शासनाने १ जुलैपासून सर्वप्रकारच्या दस्तांची नोंदणी करण्याचे आदेश सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना दिले.

पक्षकार व स्वत:ची काळजी घेत नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचाºयांनी अतिशय प्रभावी काम केले आहे. नोंदणीकृत दस्ताबरोबरच विनानोंदणी दस्तांचीही संख्या जास्त असल्याने त्याचा महसूलही मिळत आहे.
- साहेबराव दुतोंडे,
सह जिल्हा निबंधक, सांगली.

Web Title: 2700 crore revenue from diarrhea registration in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.