शिराळा तालुक्यात 3.6 मि.मी. पाऊस, वारणा धरणात 18.69 टी.एम.सी. पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 11:32 AM2021-06-26T11:32:42+5:302021-06-26T11:35:06+5:30
Rain Sangli : सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 3.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.69 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 3.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.69 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.3 (231.9), जत 0.4 (133.2), खानापूर-विटा 0.1 (97.3), वाळवा-इस्लामपूर 0.9 (240.6), तासगाव 0.5 (161), शिराळा 3.6 (354.9), आटपाडी 0.0 (82.4), कवठेमहांकाळ 0.3 (141.8), पलूस 0.4 (220.8), कडेगाव 0.4 (171.2)
जिल्ह्यातील वारणा धरणात 18.69 टी.एम.सी. पाणीसाठा
जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.69 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे.
कोयना 42.12 (105.25), धोम 5.91 (13.50), कन्हेर 4.22 (10.10), दूधगंगा 9.87 (25.40), राधानगरी 2.93 (8.36), तुळशी 1.81 (3.47), कासारी 1.06 (2.77), पाटगांव 1.70 (3.72), धोम बलकवडी 1.12 (4.08), उरमोडी 6.37 (9.97), तारळी 3.70 (5.85), अलमट्टी 89.27 (123).
सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे.
कोयना 2100, कण्हेर 24, वारणा 1610, दुधगंगा 1200, राधानगरी 2426, तुळशी 250, कासारी 250, पाटगाव 600, उरमोडी 550 व अलमट्टी 20 हजार 451 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
पाण्याची आजची पातळी पुढीलप्रमाणे
कृष्णा पूल कराड 8.11 (45), आयर्विन पूल सांगली 9.6 (40) व अंकली पूल हरिपूर 9.6 (45.11).