जिल्ह्यात शिधापत्रिका अद्यावतीकरणासाठी 36 हजार 223 प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 04:00 PM2020-03-07T16:00:19+5:302020-03-07T16:03:30+5:30
सांगली जिल्ह्यात शिधापत्रिका अद्यावतीकरण मोहिम 10 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात आली या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांकडून 36 हजार 223 शिधापत्रिकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यापैकी 9 हजार 710 शिधापत्रिका तयार झाल्या असून यातील 2 हजार 772 शिधापत्रिकांचे वाटप नागरिकांना समाधान मेळाव्यामध्ये करण्यात आले आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात शिधापत्रिका अद्यावतीकरण मोहिम 10 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात आली या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांकडून 36 हजार 223 शिधापत्रिकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यापैकी 9 हजार 710 शिधापत्रिका तयार झाल्या असून यातील 2 हजार 772 शिधापत्रिकांचे वाटप नागरिकांना समाधान मेळाव्यामध्ये करण्यात आले आहे.
पालकमंत्री जयंत पाटील, अन्न व नागरीपुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात 10 ते 20 फेब्रुवारी व वाढीव टप्प्यात 21 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत राबविणत आलेल्या शिधापत्रिका अद्यावतीकरण मोहिमे अंतर्गत केशरी दुबार शिधापत्रिका 23 हजार 859, पिवळे दुबार 5 हजार 417, शुभ्र दुबार 266 अशा एकूण 29 हजार 542 शिधापत्रिका व नविन केशरी शिधापत्रिका 6 हजार 578, शुभ्र नविन 103 एकूण 6 हजार 181 शिधापत्रिका तयार करण्याचे काम तालुकास्तरावर गतीने सुरु आहे. या मोहिमेमुळे नागरिकांचा वेळ, पैसा, श्रम यामध्ये बचत झाल्याने सर्वस्तरावरुन पुरवठा विभाग व जिल्हा प्रशासन यांचे कौतुक करण्यात येत आहे.
या शिधापत्रिका अद्यावतीकरण विशेष मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदार, सर्व तहसिलदार, त्यांचे अधिनस्त अधिकारी/कर्मचारी, अन्न धान्य वितरण अधिकारी व त्यांचे अधिनस्त कर्मचारी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी नियमित कामकज साबांळून या मोहिमेत सहभाग घेतला व मोहिम यशस्वी केली. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला याबद्दल प्रशासनाकडून नागरिकांचेही आभार व्यक्त करण्यात येत आहे.
शिधापत्रिकांसाठी आवश्यक कागदपत्रांसह जमा झालेल्या प्रस्तावांची संख्या तालुका निहाय पुढीलप्रमाणे आटपाडी झ्र 2335 यातील केशरी दुबार 1137, विभक्त अथवा नविन 189, पिवळी दुबार 973, शुभ्र दुबार 36, जत झ्र 3116 यातील केशरी दुबार 1778, विभक्त अथवा नविन 1191, पिवळी दुबार 136, शुभ्र विभक्त/नविन 11, कडेगाव झ्र 1921 यातील केशरी दुबार 1375, विभक्त अथवा नविन 318, पिवळी दुबार 206, शुभ्र दुबार 20, विभक्त नविन 2, कवठेमहाकाळ झ्र 2222 यातील केशरी दुबार 1330, विभक्त अथवा नविन 286, पिवळी दुबार 181, शुभ्र दुबार 20, विभक्त/नविन 5, खानापूर झ्र 2096 यातील केशरी दुबार 1485, विभक्त अथवा नविन 185, पिवळी दुबार 422, शुभ्र दुबार 4, मिरज झ्र 2402 यातील केशरी दुबार 1571, विभक्त अथवा नविन 306, पिवळी दुबार 499, शुभ्र दुबार 26, पलूस झ्र 2811 यातील केशरी दुबार 1460, विभक्त अथवा नविन 1320, पिवळी दुबार 27, शुभ्र दुबार 3, विभक्त/नविन 1, सांगलीझ्र 5279 यातील केशरी दुबार 2940, विभक्त अथवा नविन 501, पिवळी दुबार 1759, शुभ्र दुबार 51, विभक्त/नविन 28, शिराळा झ्र 2514 यातील केशरी दुबार 1175, विभक्त अथवा नविन 603, पिवळी दुबार 717, शुभ्र दुबार 09, विभक्त/नविन 10, तासगाव झ्र 7407 यातील केशरी दुबार 6060, विभक्त अथवा नविन 1050, पिवळी दुबार 262, शुभ्र दुबार 30, विभक्त/नविन 5, वाळवा झ्र 4120 यातील केशरी दुबार 3148, विभक्त अथवा नविन 629, पिवळी दुबार 235, शुभ्र दुबार 67, विभक्त/नविन 41, असे एकूण जिल्ह्यातून 36,223 अर्ज प्राप्त झाले असून यातील केशरी दुबार 23859, विभक्त अथवा नविन 6578, पिवळी दुबार 5417, शुभ्र दुबार 266, विभक्त/नविन 103 अर्ज प्राप्त झाले आहेत.
आवश्यक कागदपत्रे दुकानदारांकडे जमा केल्यावर कुठेही हेलपाटे मारावे न लागता घरपोच नवीन रेशनकार्ड मिळाले याचा खूप आनंद आहे.
उषा भरत शिंदे,
रा. सावळी ता .मिरज
20 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड होते, ते जिर्ण होऊन खराब झाल्याने त्यावर तपशिल लिहायलाही अडचण होत होती. रेशन दुकानदारांनी या मोहिमेची माहिती दिली. त्याप्रमाणे कागदपत्रे गोळा केली. शासकीय शुल्क आकारून त्याची पावती दिली. कार्ड तयार करून घरपोच केले. त्या बद्दल मी शासनाचा आभारी आहे.
आनंदा ज्ञानू कांबळे .