मणेराजुरीच्या द्राक्षबागायतदारांना ४० लाखांचा गंडा,: दिल्लीतील व्यापाऱ्याविरूध्द तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:51 PM2018-03-12T23:51:34+5:302018-03-12T23:51:34+5:30

 40 lakhs for Manaburi's vineyards: Complaint against Delhi businessman | मणेराजुरीच्या द्राक्षबागायतदारांना ४० लाखांचा गंडा,: दिल्लीतील व्यापाऱ्याविरूध्द तक्रार

मणेराजुरीच्या द्राक्षबागायतदारांना ४० लाखांचा गंडा,: दिल्लीतील व्यापाऱ्याविरूध्द तक्रार

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची पोलिस ठाण्यात धाव; चौकशी सुरु

तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील १६ द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांना तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली येथील एका व्यापाºयाने हे कृत्य केले असल्याची व तो पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार संबंधित शेतकºयांनी तासगाव पोलिसांत दिली आहे.

संबंधीत व्यापारी सध्या सोलापूर येथे राहतो. मणेराजुरी येथे द्राक्ष खरेदीसाठी काही महिन्यांपूर्वी तो आला. त्याने संंबंधीत सोळा शेतकऱ्यांच्या बागेमध्ये जाऊन द्राक्ष पसंत केली. दर ठरवला. प्रत्येक शेतकºयाला काही रक्कमही दिली.यामुळे शेतकºयांचा संबंधीत व्यापाऱ्यावर विश्वास बसला. यानंतर व्यापारी पैसे काही दिवसात देण्याचा वायदा करुन सर्व द्राक्षे घेऊन गेला. मात्र यानंतर संबंधीत व्यापाºयाने पैसे देण्यास चालढकल करण्यास सुरूवात केली.फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधीत शेतकऱ्यांनी तासगाव पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. याबाबत अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसून संबंधीत व्यापाºयाला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Web Title:  40 lakhs for Manaburi's vineyards: Complaint against Delhi businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.