दिघंची हायस्कूल येथे ५६ बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:25 AM2021-05-15T04:25:05+5:302021-05-15T04:25:05+5:30
फोटो ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथे कोविड सेंटरचे उद्घाटन अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार सचिन मुळीक, ...
फोटो ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथे कोविड सेंटरचे उद्घाटन अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार सचिन मुळीक, भानुदास निंभोरे, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे दिघंची हायस्कूलमध्ये भाजप युवा मोर्चा व कै. नामदेवराव काळे ग्रंथालय यांच्यावतीने श्रीमंत बाबासाहेब देशमुख कोविड सेंटर सुरु करण्यात आले. शुक्रवारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला तहसीलदार सचिन मुळीक, सहाय्यक पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, गटविकास अधिकारी शेळके, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पवार, आण्णा रणदिवे, सावंता पुसावळे उपस्थित होते.
तहसीलदार सचिन मुळीक म्हणाले, दिघंचीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याने रुग्णांची सोय होणार आहे व कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यासाठी मदत होईल व गोरगरिबांना सोयीचे होईल.
डॉ. विनायक पवार म्हणाले, दिघंचीत दुसऱ्या लाटेत ७५०पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर २५०पेक्षा जास्त लोकांना फॅबी फ्लू गोळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोफत देण्यात आल्या आहेत.
दिघंचीत कोविड सेंटर सुरू करण्यासाठी प्रणव गुरव, सोपान काळे, केशव मिसाळ, निनाद मोरे, चंदू पुसावळे, अजित मोरे, अविनाश रणदिवे, प्रकाश शिंदे, ऋतुराज देशमुख, अमोल सावंत, प्रशांत चोथे यांनी पुढाकार घेतला.