जिल्ह्यात तासगाव तालुक्यात 5.7 मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 01:21 PM2021-06-24T13:21:25+5:302021-06-24T13:24:02+5:30
Rain Sangli : सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून तासगाव तालुक्यात 5.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.30 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून तासगाव तालुक्यात 5.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.30 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 1.0 (230.3), जत 0.4 (131.9), खानापूर-विटा 0.2 (95.5), वाळवा-इस्लामपूर 0.4 (238.7), तासगाव 5.7 (160.4), शिराळा 1.7 (347.1), आटपाडी 0.0 (81.8), कवठेमहांकाळ 3.6 (140.8), पलूस 0.1 (220.1), कडेगाव 0.1 (170.7)
वारणा धरणात 18.30 टी.एम.सी. पाणीसाठा
जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.30 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता पुढीलप्रमाणे.
कोयना 41.45 (105.25), धोम 5.85 (13.50), कन्हेर 4.07 (10.10), दूधगंगा 9.82 (25.40), राधानगरी 3.13 (8.36), तुळशी 1.83 (3.47), कासारी 1.05 (2.77), पाटगांव 1.76 (3.72), धोम बलकवडी 1.24 (4.08), उरमोडी 6.36 (9.97), तारळी 3.67 (5.85), अलमट्टी 88.76 (123).
सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे
कोयना 2100, कण्हेर 24, वारणा 1600, दुधगंगा 1200, राधानगरी 1300, तुळशी 250, कासारी 250, पाटगाव 600, उरमोडी 550 व अलमट्टी 37866 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी पुढीलप्रमाणे
कृष्णा पूल कराड 9.6 (45), आयर्विन पूल सांगली 10.0 (40) व अंकली पूल हरिपूर 10.6 (45.11).