सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी घट होत नवे ६३३ रुग्ण आढळले. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत ९४९ जण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला, तर परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील २२ जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसचे दोन रुग्ण आढळले.
रुग्णसंख्येतील घट रविवारीही कायम राहिल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील २२ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली, मिरज प्रत्येकी दोन, मिरज तालुक्यात पाच, कडेगाव, खानापूर, पलूस, कवठेमहांकाळ, वाळवा तालुक्यांत प्रत्येकी दोन, आटपाडी, जत, तासगाव तालुक्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर अंतर्गत १९८४ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात २२५ बाधित आढळले, तर रॅपिड ॲँटिजनच्या ६६१९ जणांच्या नमुने तपासणीतून ४३४ जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत घट होतानाच आता आठ हजार ६०९ जण उपचार घेत आहेत, त्यातील ११११ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ९४९ जण ऑक्सिजनवर, तर १६२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू, तर नवे २६ रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १३६१५८
उपचार घेत असलेले ८६०९
कोरोनामुक्त झालेले १२३६६१
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३८८८
पॉझिटिव्हिटी रेट ७.६५
रविवारी दिवसभरात
सांगली १०७
मिरज ३५
आटपाडी २४
कडेगाव ८२
खानापूर ५१
पलूस ३९
तासगाव ३१
जत ३९
कवठेमहांकाळ २०
मिरज तालुका ३६
शिराळा ५२
वाळवा ११७