जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९०१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:36 AM2021-06-16T04:36:39+5:302021-06-16T04:36:39+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवारी घट झाल्याने थोडा दिलासा मिळाला. दिवसभरात नवे ९०१ रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील ...
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवारी घट झाल्याने थोडा दिलासा मिळाला. दिवसभरात नवे ९०१ रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील २० व परजिल्ह्यातील ३ अशा २३ जणांचा मृत्यू झाला. ८८९ जणांनी कोरोनावर मात केली. तर उपचाराखालील ११२७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होत आहे. सोमवारी हजारापुढे गेलेली रुग्णसंख्या मंगळवारी पुन्हा ९०० पर्यंत खाली आली. मंगळवारी वाळवा तालुक्यात सर्वाधिक २२० रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात ४०, जत २६, कडेगाव ५६, कवठेमहांकाळ २९, खानापूर ५६, मिरज १००, पलूस ८१, शिराळा ७५, तासगाव ९२, तर महापालिका क्षेत्रात सांगलीत ९३, मिरजेत ३३ असे १२६ रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, कर्नाटकातील २७ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात जिल्ह्यातील २० जणांचा मृत्यू झाला. त्यात कडेगाव, खानापूर तालुक्यातील प्रत्येकी १, पलूस, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी दोन, तासगाव ३, वाळवा तालुक्यातील ५, तर महापालिका क्षेत्रात सांगलीतील एक, मिरजेतील तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील कोल्हापूर, रत्नागिरी, कर्नाटकातील प्रत्येकी एक अशा तीन जणांचाही कोरोनाने बळी घेतला.
सध्या १,१२७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे तर जिल्ह्यातील ८८९ व जिल्ह्याबाहेरील १० रुग्णांनी कोरोनावर मात केली. एकूण आरटीपीसीआरच्या २,६९० चाचण्यात २७० पाॅझिटिव्ह तर अँटिजनच्या ८,३३७ चाचण्यात ६५८ रुग्ण सापडले.
चौकट
म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २५१ जणांना म्युकरमायकोसिस झाले असून त्यापैकी १४ जणांचा बळी गेला आहे. मंगळवारीही चार नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,३२,१७५
कोरोनामुक्त झालेले : १,१९,३६६
आतापर्यंतचे मृत्यू : ३,७७७
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
सांगली : ९३
मिरज : ३३
आटपाडी : ४०
जत : २६
कडेगाव : ५६
कवठेमहांकाळ : २९
खानापूर : ५६
मिरज : १००
पलूस : ८१
शिराळा : ७५
तासगाव : ९२
वाळवा : २२०