हरफळे व वाई येथील शंभू-रायफल'जोडीने पटकावला २१ लाख रुपये किंमतीचा १बीएचके फ्लॅट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2024 01:46 PM2024-02-18T13:46:56+5:302024-02-18T13:50:38+5:30
या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास २०० बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता.
- प्रताप बडेकर
सांगली: कासेगाव ता.वाळवा येथील संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या'जयंत केसरी'बैलगाडा स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे २१ लाख रुपये किंमतीचा १बीएचके प्लॅट हरफळे व वाई येथील शंभू-रायफल'जोडीने पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास २०० बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता.
माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव ता.वाळवा येथे ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक अतुल लाहीगडे यांच्या वतीने 'जयंत केसरी' बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत देशभरातील नामवंत बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या.तब्बल ७० एकर शेतजमिनी वर मैदान तयार करण्यात आले होते. स्पर्धेचे सर्व निकाल हे स्क्रीन व ड्रोन द्वारे देण्यात आले.ही स्पर्धा पाहण्यासाठी जवळपास ७५ हजार बैलगाडा शौकिनाची उपस्थित होती.यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
निकाल
प्रथम क्र) १ बीएचके प्लॅट (२१लाख रुपये)अमित शेठ,सुमित शेठ,अधिक शेठ हरफळे,फुरसगी ,पै. सचिन चव्हाण वाई यांच्या शंभू-रायफल या जोडीने
द्वितीय क्र)६ लाख ६२२५/-अमोल पैलवान वाटेगावकर, किरण राऊत बदलापूर
तृतीय क्र)३ लाख ६२६५/-संदीप मोडक वडळी,अजयशेठ पाटील दरंगा
चतुर्थ क्र)मोहिल धुमाळ सुसगाव, अक्षय मोरे,राजू पाटील,गाडोली
पाचवा क्र)1 लाख ६२२६५/-नितीन शेवाळे हडपसर,जय-पराजय ग्रुप नाशिक
सहावा क्र)६२२६५/-मोहन मदने,पेठ,पंढरीशेठ पनवेल
सातवा क्र)६२२६५/-विजय मदने,संजय मदने,माळशिरस, सर्वेश पाटील,माणगाव
आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी माजी जि.प अध्यक्ष देवराज पाटील,माजी नगरसेवक खंडेराव नाईक,अतुल लाहीगडे,
आमदार जयंत पाटील यांच्या कडून बैलगाडीचे सारथ्य
या स्पर्धेकरिता आ.जयंत पाटील यांनी स्वतः बैलगाडीचे सारथ्य करत संयोजक अतुल लाहीगडे,खंडेराव जाधव यांच्या सोबत ते कार्यक्रमास्थळी आले. यावेळी उपस्थित बैलगाडी शौकिनांना त्यांनी अभिवादन केले.