फोटो ओळ : विराज कारखाना स्थळावर ज्योतिबा मंदिर परिसरात वृक्षारोपणावेळी जनरल मॅनेजर युवराज गायकवाड, सुभाष शेटे, रवी पाटील, सागर चव्हाण, अशोक साळुंखे, अभिजित पाटील, सुभाष पाटील, संदीप कदम आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांचा वाढदिवस विराज उद्योग समूहात सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. विराज कारखाना परिसरातील ज्योतिबा पादुका मंदिरात अभिषेक, पूजाविधी झाले. विराज कारखाना प्रशासनाकडून विराज कॅटल फिडस कारखाना परिसरात वनौषधी व फळ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
विराज कारखान्याचे जनरल मॅनेजर युवराज गायकवाड म्हणाले की, काही वर्षांपूर्वी ज्योतिबा पादुका मंदिर ठिकाणी माळरान होते. परंतु या माळरानावर उद्योग उभारण्याचे स्वप्न आमदार मानसिंगराव नाईक यांनी पाहिले. त्यांच्या स्वप्नाला वास्तवाचा आकार मिळाला आणि विराज उद्योग समूहाची निर्मिती झाली आहे. विराज उद्योग समूहाच्या प्रशासनाची बहुतांश जबाबदारी आमदार मानसिंग भाऊ यांनी विराज नाईक यांच्याकडे सोपवली. यामध्ये युवा नेते विराज नाईक यांनी उद्योग समूहाच्या यशात सातत्य राखले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा विराज उद्योग समूह यशाचे आलेख पादाक्रांत करत पुढची वाटचाल करीत आहे.
विराज कारखाना स्थळावर ज्योतिबा मंदिर परिसरात वृक्षारोपणवेळी जनरल मॅनेजर युवराज गायकवाड, सुभाष शेटे, रवी पाटील, सागर चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शेटे, शंकर सोनटक्के, अशोक साळुंखे, अभिजित पाटील, सुभाष पाटील, संदीप कदम आदी उपस्थित होते.