लसीकरणाचा वेग वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:26 AM2021-04-17T04:26:41+5:302021-04-17T04:26:41+5:30
कवठेमहांकाळ तालुका दौऱ्यादरम्यान शुक्रवारी कवठेमहांकाळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयास कदम यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. कदम ...
कवठेमहांकाळ तालुका दौऱ्यादरम्यान शुक्रवारी कवठेमहांकाळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयास कदम यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
कदम यांनी या वेळी नगरपंचायत येथे आढावा बैठक घेतली. अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व सूचना केल्या.
ग्रामीण व शहरी भागात जनजागृती करून लसीकरणाचा वेग वाढवावा. काही अडचणी असल्यास सांगाव्यात, त्या सोडवल्या जातील, असेही कदम यांनी सांगितले.
प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी माणिकराव भोसले, तालुकाध्यक्ष संजय हजारे, खजिनदार उदय शिंदे, उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला, प्रा. दादासाहेब ढेरे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस वैभव गुरव, संग्राम सोनवणे, विशाल शिंदे, तहसीलदार बी.जे. गोरे, मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.