राजारामनगर येथे सन २०२१-२२ मधील गाळपाच्या ऊसतोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रेणीक कबाडे, प्रशांत पाटील, सुभाष जमदाडे, प्रताप पाटील, सुजय पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याकडे सन २०२१-२२ साठी १९ हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या गळीत हंगामातील उद्दिष्ट निश्चित पूर्ण केले जाईल, असा विश्वास सांगली जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष युवानेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.
साखराळे, वाटेगाव-सुरुल आणि कारंदवाडी युनिटच्या तोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुभाष पाटील, संभाजी कामेरीकर, राजेंद्र माळी, जयकर कदम, विलास खोत, महादेव देवकर, प्रमोद पाटील, अर्जुन कचरे, शहाजी पाटील यांच्याशी करार करण्यात आले. शेती कमिटीचे अध्यक्ष श्रेणिक कबाडे, सुभाष जमदाडे, सचिव प्रताप पाटील, प्रेमनाथ कमलाकर, डी. एम. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ऊस विकास अधिकारी सुजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी तानाजी खराडे, विजय कुलकर्णी, दिलीप पाटील, चंद्रकांत जाधव, गटाधिकारी संग्राम पाटील, महेश कदम, अभिजित कुंभार, रोहित साळुंखे, प्रनिल पाटील, संग्राम पाटील, भास्कर केवळे, संजय पाटील, शिवाजी पवार, योगेश पाटील यांच्यासह कर्मचारी, कंत्राटदार उपस्थित होते.