कृषी अधिकाऱ्यांनी दुकानदारांना साडेतीन तास ताटकळत बसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:26 AM2021-04-17T04:26:44+5:302021-04-17T04:26:44+5:30
सांगली : संचारबंदीचा आदेश धाब्यावर बसवून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शुक्रवारी काही कृषी दुकानदारांना नोटीस काढून सुनावणीसाठी बोलविले ...
सांगली : संचारबंदीचा आदेश धाब्यावर बसवून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शुक्रवारी काही कृषी दुकानदारांना नोटीस काढून सुनावणीसाठी बोलविले होते. या दुकानदारांना सकाळी दहा वाजता बोलेविल्यानंतर साडेतीन तासांनी अधिकारी उपस्थित राहिले. याबद्दल दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली.
तासगाव तालुक्यातील तीन कृषी दुकानदारांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दि. ७ एप्रिल रोजी नोटिसा बजावल्या होत्या. शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत सूचना दिली होती. त्यानुसार दुकानदार सकाळी १० वाजता येथील कार्यालयात हजर होते. अधिकारी पावणेअकरा वाजता कार्यालयात आले. अवघे दहा मिनिटे कार्यालयात थांबून ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेले. त्यानंतर दीड वाजता ते परत आले. त्यामुळे साडेतीन तास दुकानदारांना ताटकळत बसावे लागले. याबद्दल दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली.