मणदूर आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:31 AM2021-07-14T04:31:54+5:302021-07-14T04:31:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : मणदूर (ता. शिराळा) प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका दाखल झाली. त्यामुळे डोंगरकपारीतील वाड्या-वस्त्यांवरील लोकांची सोय ...

Ambulance admitted to Mandoor Health Center | मणदूर आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका दाखल

मणदूर आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणावती : मणदूर (ता. शिराळा) प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका दाखल झाली. त्यामुळे डोंगरकपारीतील वाड्या-वस्त्यांवरील लोकांची सोय झाली आहे, असे मत सरपंच वसंत पाटील व वैद्यकीय अधिकारी डाॅ. परब यांनी व्यक्त केले.

मणदूर, कोकरूड व सागाव आरोग्य केंद्रांसाठी १४ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या रुग्णवाहिका मंगळवारी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. मणदूरसाठीची रुग्णवाहिका नुकतीच दाखल झाली. त्याचे श्रीफळ फोडून सरपंच वसंत पाटील व डाॅ. परब यांनी लोकार्पण केले.

यावेळी सरपंच वसंत पाटील, ग्रामसेवक एम. एन. पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी स्टाफ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Ambulance admitted to Mandoor Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.