आष्टा शहरातील तक्क्या पाडण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:13+5:302021-01-04T04:23:13+5:30

आष्टा : आष्टा शहरात बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या तक्क्याची इमारत जीर्ण झाल्याने ती पाडण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ...

Ashta city demolition work started | आष्टा शहरातील तक्क्या पाडण्याचे काम सुरू

आष्टा शहरातील तक्क्या पाडण्याचे काम सुरू

Next

आष्टा : आष्टा शहरात बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या तक्क्याची इमारत जीर्ण झाल्याने ती पाडण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. याठिकाणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्यातून भव्य समाज मंदिर उभारण्यात येणार आहे.

आष्टा शहरात बौद्ध समाजाच्यावतीने सुमारे तीनशे वर्षांपूर्वी इमारत बांधण्यात आली होती. याठिकाणी समाजाचा न्याय-निवाडा हाेत होता. तसेच सुमारे १३० वर्षांपासून जिल्हा परिषदेची शाळा सुरू होती. सध्या ही इमारत जीर्ण झाल्याने नवीन इमारत बांधण्याची मागणी होत होती. नगरसेवक विजय मोरे, प्रतिभा पेटारे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली होती. जयंत पाटील यांनी या तक्क्याच्या ठिकाणी भव्य समाजमंदिर बांधून देण्यास मान्यता दिल्यानंतर जीर्ण झालेली इमारत पाडण्याच्या काम सुरू झाले आहे. यावेळी नगरसेवक विजय मोरे, प्रतिभा पेटारे सुशील भंडारे, विजय हाबळे, जितेंद्र कांबळे, सुशील पेटारे, एन. एस. भंडारे, विजय पेटारे, सूजाता वीरभक्‍त, दीपक मेथे, संदीप वीरभक्त, अंकुश मदने व सहकारी उपस्थित होते.

काेट

आष्टा येथील बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान असलेली ही ३०० वर्षांपूर्वीची इमारत होती. येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली होती. माजी आमदार विलासराव शिंदे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे नागरिकांनी नवीन इमारतीची मागणी केली होती. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या ठिकाणी भव्य समाजमंदिरास मान्यता दिली असून याठिकाणी ग्रंथालय, व्यायामशाळा व सभागृह बांधण्यात येणार आहे.

- विजय मोरे ,नगरसेवक, आष्टा नगरपरिषद

फोटो : ०३ आष्टा ३

आष्टा येथील जीर्ण तक्क्याची इमारत पाडण्याचे काम नगरसेवक विजय मोरे, जनार्दन पेटारे, जितेंद्र कांबळे, एन. एस. पेटारे, विजय पेटारे, दीपक मेथे, अंकुश मदने यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले.

Web Title: Ashta city demolition work started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.