त्यांच्यावर पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गरुवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र व पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक रामचंद्र कदम, बंधू आमदार मोहनराव कदम व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, पुतणे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह कदम कुटुंबीय उपस्थित होते.
माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे, माजी मंत्री रमेश बागवे, पुणे महापालिकेचे गटनेते आबा बागुल, भारती विद्यापीठाचे कुलगुरू माणिकराव साळुंखे, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, सोनहिरा कारखान्याचे संचालक पी. सी. जाधव यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पुणे शहर आणि पलूस - कडेगाव तालुक्यातील नागिरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो-२५आत्माराम कदम निधन