गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक क्षेत्र निर्माण करून आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावातील १०५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांपैकी आजपर्यंत जवळपास ४० हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळत आहे. प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका आरोग्याधिकारी डॉ. आशा चौगुले यांनी गावात स्वच्छता व आरोग्य सर्वेक्षण, होम आयसोलेशनमधील पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर न फिरणे, गावात गर्दी न होऊ देणे, मास्कचा वापर यांबाबतच्या सूचना केल्या आहेत. ग्रामसमिती योग्य त्या दक्षता घेत आहे. याशिवाय गावातील अनेक सुज्ञ नागरिक कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा व सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून ही लढाई जिंकावी यासाठी प्रयत्न करीत आहेत.
घाबरू नका, दक्षता घ्या. सर्दी, खोकला व ताप जास्त दिवस अंगावर काढू नका. संशय आल्यास तातडीने कोरोनाची चाचणी करून घ्या.
गावातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. दक्षता घ्यावी, असे आवाहन कोरोना ग्रामसमितीमार्फत करण्यात येत आहे.