अंकलखोप : अंकलखाेप (ता. पलुस) येथील बाजीरावअप्पा सहकारी बँकेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देश केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
मुख्य कार्यकारी अधिकारी एम. ए. पाटील यांनी अहवाल वाचन केले. बँकेची प्रगती समाधानकारक असून, बँकेची वसुली ९८.३६ टक्के आहे. नेट एन.पी.ए. शून्य टक्के असून, सी.आर.ए.आर. २०.९३ टक्के आहे.
यावेळी कोरोना काळात बँक आर्थिक अडचणीतून बाहेर काढून व्यवसाय वाढ केल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव सतीश पाटील यांनी मांडला. त्याला प्रमोद मिरजकर यांनी अनुमोदन दिले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे एम. ए. पाटील यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत सूर्यवंशी, सरपंच अनिल विभुते, सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मगदूम, संस्थापक हणमंत पाटील, सर्जेराव पाटील, धैर्यशील पाटील, ए. के. चौगुले, सतीश पाटील, अशोक हजारे, दुष्यंत मिरजकर, धनंजय पाटील, विनायक पाटील, तसेच सर्व सभासद व हितचिंतक उपस्थित होते.