शिगावात कोरोनाविरोधात लढताहेत पडद्यामागील हिरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:25 AM2021-05-15T04:25:02+5:302021-05-15T04:25:02+5:30
ग्रामपंचायत, कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, अंगणवाडी सेविका आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहेत. त्याचबरोबर प्रकाश ...
ग्रामपंचायत, कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, अंगणवाडी सेविका आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहेत. त्याचबरोबर प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूरच्या माध्यमातून निशिकांत भोसले-पाटील यांनी गावात कोरोना विलगीकरण कक्षासाठी ५० पीपीई कीट, ऑक्सिमीटर, थर्मल गन, सॅनिटायझर, मास्क व इतर साहित्य दिले आहे. लोकनियुक्त सरपंच उत्तम गावडे हेही गाव कोरोनामुक्त होण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावत आहेत. महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन हे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून गावातील व्यवहार बंद करून कोरोनाविरोधात लढा देत आहेत. सामाजिक कार्यकर्ते निवास पाटील यांनी या काळात असंख्य कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर मिळवून देणे, बेड उपलब्ध करणे, हॉस्पिटल मिळवून देणे, गरीब घरातील रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांना शासकीय बेड उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पाटील यांनी विलगीकरण कक्षासाठी स्वखर्चातून साहित्य उपलब्ध करून दिले आहे. ग्रामपंचायत सदस्य काशिलिंग गावडे यांनीही स्वतःचे वाहन गावातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दिले आहे. ते स्वत: रुग्णांना घेऊन रुग्णालयात जातात. त्यांच्यासह गावातील अनेक मान्यवर पडद्यामागे राहून काेराेनाविराेधी लढ्यामध्ये याेगदान देत आहेत.