संजय ठिगळेंच्या ‘अर्थभान’ पुस्तकास उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:26 AM2021-04-17T04:26:19+5:302021-04-17T04:26:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोल्हापूर येथील हौसाबाई पवार ट्रस्ट व राज प्रकाशन यांच्यातर्फे सांगलीतील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोल्हापूर येथील हौसाबाई पवार ट्रस्ट व राज प्रकाशन यांच्यातर्फे सांगलीतील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्रा. संजय ठिगळे यांच्या 'अर्थभान' या पुस्तकास 'राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार' जाहीर झाला आहे.
लॉकडाऊन काळात प्रकाशित झालेल्या राज्यभरातील विविध साहित्य कृतींना 'राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. यामध्ये प्रा. ठिगळे लिखित 'अर्थभान' या पुस्तकाचा समावेश आहे. डॉ. सुजय पाटील, कवियत्री गौरी भोगले व प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी पुस्तक परीक्षण केले. प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, लॉकडाऊनचा आर्थिक क्षेत्रावर झालेला परिणाम यात मांडला आहे. ‘अर्थभान’ हे पुस्तक सर्वसामान्यांना अर्थशास्त्रासारखा विषय साध्या व सोप्या भाषेत समजावा, या उद्देशाने केलेला प्रयत्न आहे.