भोसेत विवाहितेची आत्महत्या

By Admin | Published: October 9, 2015 01:26 AM2015-10-09T01:26:17+5:302015-10-09T01:27:01+5:30

पती, सासूस चोप : सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार

Bhoset's Marriage Suicide | भोसेत विवाहितेची आत्महत्या

भोसेत विवाहितेची आत्महत्या

googlenewsNext

मिरज : तालुक्यातील भोसे येथे विवाहितेच्या आत्महत्येमुळे संतप्त झालेल्या माहेरच्या नातेवाइकांनी पती व सासूस बेदम मारहाण केली. पतीच्या घरासमोरच पत्नीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.भोसे येथील तासवडे गल्लीतील संगीता जाधव हिचा पाच वर्षांपूर्वी गावातील माने वस्तीवरील संजय माने याच्यासोबच विवाह झाला होता. संगीताला चार वर्षांचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी आहे. लग्न झाल्यापासून पती संजय व सासू छळ करीत असल्याने संगीता त्रस्त होती. गुरुवारी गावातील कुरणे वस्तीजवळ विहिरीत संगीताचा मृतदेह सापडला. तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. संगीताच्या मृत्यूमुळे संतप्त झालेली माहेरची मंडळी व नातेवाइकांनी दुपारी मृतदेह घेऊन पतीचे घर गाठले. छळामुळे संगीताचा मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर पती व सासूसोबत त्यांची जोरदार वादावादी झाली. त्यातून संगीताच्या माहेरच्या नातेवाइकांनी पती व सासूस बेदम मारहाण केली. त्यानंतर पती संजय माने याच्या घराच्या दरवाजासमोरच चिता रचून संगीताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जमाव जमला होता. रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)

Web Title: Bhoset's Marriage Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.