सांगलीत भाजपची चीनविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 04:31 PM2020-06-19T16:31:13+5:302020-06-19T16:32:30+5:30
सांगली शहर भाजपाच्यावतीने शुक्रवारी चीनच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून चीनच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची प्रतिमाही जाळली. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
सांगली : शहर भाजपाच्यावतीने शुक्रवारी चीनच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून चीनच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची प्रतिमाही जाळली. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
गाडगीळ म्हणाले की, चीनी सैनिकांनी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करून २० जवानांना शहीद केले होते. त्याबद्दल सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिकांनी यापुढे कोणत्याही प्रकारच्या चीनी वस्तू वापरू नयेत त्यासाठी प्रबोधन करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चीनी राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमेचे दहन करत जोडेमार आंदोलन केले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, प्रदेश उपाध्यक्षा नीताताई केळकर, महापौर गीता सुतार, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मुन्ना कुरणे, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेवक गजानन मगदूम, महिला बालकल्याण समिती सभापती नसीमा नाईक, नगरसेविका सविता मदने, सोनाली सागरे, लक्ष्मण नवलाई, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक माने, पृथ्वीराज पाटील, रवींद्र सदामते, धनेश कातगडे, बंडू सरगर, सुजित राउत, श्रीकांत शिंदे, विशाल मोरे, अतुल माने, दरीबा बंडगर, सुजित राऊत, अंकुर तारळेकर, चेतन माडगुळकर, किरण पाटील, अनिकेत खिलारे, राहुल माने, अनिकेत बेळगावे, अमित भोसले, महेश सागरे उपस्थित होते