वांगी : एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना एकरकमी ऊस बिल दिल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम व व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. तसेच उदगिरी शुगर कारखान्यानेही एकरकमी एफआरपीप्रमाणे दर दिल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे ऊर्जा प्रमुख प्रशांत बुराडे, ॲड तुषार झेंडे, संदीप जंगम, पी. सी. जाधव, बापूसाहेब पाटील, दिलीपराव सूर्यवंशी उपस्थित होते.
मोहनराव कदम म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. कारखान्याच्या सर्व सभासद व बिगर सभासद यांनी कारखान्यावर विश्वास ठेवून चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्यास दिला. तसेच कारखाना प्रशासनाने तोडीचे योग्य नियोजन केले. त्यामुळे उसाला चांगला व एकरकमी दर देता आला.
यावेळी सोनहिराचे संचालक युवराज कदम, सयाजी धनवडे, पंढरीनाथ घाडगे, चंद्रकांत पाटील, जयवंत पाटील, अनंत खोचरे, तानाजी यादव, गणपती सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.
फोटो-१०वांगी१
फोटो ओळ :
वांगी (ता. कडेगाव) येथे सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला.