आठ जागांवर उमेदवारांची झुंबड
By Admin | Published: September 28, 2014 12:43 AM2014-09-28T00:43:24+5:302014-09-28T00:44:28+5:30
विक्रमी अर्ज दाखल : सर्वाधिक अर्ज सांगलीतून ३८, तर सर्वात कमी शिराळ्यातून १५
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज (शनिवार) संपली. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतून आजअखेर २२५ जणांनी ३५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शेवटच्यादिवशी १३२ जणांचे २०० अर्ज दाखल झाले. सर्वाधिक उमेदवारी अर्ज सांगलीतून (३८), तर सर्वात कमी उमेदवारी शिराळा मतदारसंघातून (१५) दाखल झाले आहेत. उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना उमेदवारांच्या नेत्यांचेही शेवटच्या क्षणापर्यंत आणखी कोण सक्षम उमेदवार मिळेल का? याचा शोध सुरु होता.
सांगली : सांगली विधानसभेसाठी आजअखेर (शनिवार) ३८ जणांनी ६७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी २३ जणांनी ३९ उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गर्दी झाली होती. दिनकर पाटील, दिगंबर जाधव, स्वाती शिंदे, शिवाजी डोंगरे आदींनी शक्तिप्रदर्शन करीत विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये सुरेश पाटील (राष्ट्रवादी), डॉ. जयश्री पाटील (जनसुराज्य पक्ष), शिवाजी डोंगरे (अपक्ष), दिगंबर जाधव (अपक्ष), स्वाती शिंदे (मनसे), राजेंद्र पाटील (बहुजन रयत पार्टी), दिनकर पाटील (अपक्ष), तुकाराम बळवंत पाटील (अपक्ष), मीनाक्षी पाटील (अपक्ष), दस्तगीर मलीदवाले (बहुजन मुक्ती पार्टी), इम्रान मुल्ला (बहुजन मुक्ती पार्टी), उत्तम मोहिते (अपक्ष), दाऊद तहसीलदार (अपक्ष), शैलेंद्र सॅमसन (अपक्ष), सुरेश टेंगले (अपक्ष), इंद्रजित पाटील (अपक्ष), विनायक होवाळे (अपक्ष), संभाजी (शंभोराज) काटकर (अपक्ष) आदींचा समावेश आहे. कालअखेर अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये मदन पाटील (काँग्रेस), मुन्ना कुरणे (अपक्ष), संभाजी पवार (अपक्ष), अंकुश घुले (अपक्ष) सचिन पवार (बहुजन समाज पार्टी), धनंजय गाडगीळ (भाजप), अजित अडवाणी (अपक्ष), हणमंत पवार (अपक्ष), नसिम महात (अपक्ष), दीपक पाटील (अपक्ष), इद्रिस नायकवडी (अपक्ष), प्रमोद देवकाते, अशोक वारे (अपक्ष), सचिन पवार (अपक्ष) आदींचा समावेश आहे. आज अर्ज दाखल केलेले उमेदवार असे- रवीदास पाटील (अपक्ष), नानासाहेब बंडगर (बहुजन समाज पार्टी), धनपाल तात्या खोत (अपक्ष), असिफ बावा (अपक्ष), अझरुद्दीन पटेल (अपक्ष), पृथ्वीराज पवार (शिवसेना), कविता विकास बोंद्रे (अपक्ष).
शिराळ्यातून २३ अर्ज दाखल
शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवसाअखेर १५ उमेदवारांचे २३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सत्यजित देशमुख (काँग्रेस), आमदार मानसिंगराव फत्तेसिंगराव नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस), माजी आमदार शिवाजीराव नाईक (भाजप), सम्राट महाडिक (अपक्ष), नंदकिशोर निलकंठ (शिवसेना), वैभव वाघमारे (बसप), आनंदराव सरनाईक (अपक्ष), संजय जाधव (अपक्ष), रणधीर नाईक (भाजप), मोहन ऐतवडेकर (अपक्ष), हंबीरराव पाटील (अपक्ष), हणमंतराव नपाटील (काँग्रेस), विश्वजित पवार (अपक्ष), शरद कांबळे (अपक्ष), बबनराव परीट (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.