देशी गाईचे खोंड देऊन भांडवले कुटुंबाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 03:02 PM2021-04-14T15:02:06+5:302021-04-14T15:13:13+5:30
Shilala Help Sangli : सांगली जिल्हयातील पाडळी येथील तात्या भांडवले यांच्या गुरांच्या गोठ्यास आग लागून जनावरांचा मृत्यू झाला होता. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याच गावातील वसंत पाटील कुटुंबीयांनी भांडवले यांना देशी गाईचे खोंड देऊन या कुटुंबाला आधार दिला.
विकास शहा
शिराळा : सांगली जिल्हयातील पाडळी येथील तात्या भांडवले यांच्या गुरांच्या गोठ्यास आग लागून जनावरांचा मृत्यू झाला होता. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याच गावातील वसंत पाटील कुटुंबीयांनी भांडवले यांना देशी गाईचे खोंड देऊन या कुटुंबाला आधार दिला.
एखाद्यावर संकट आले की त्यास मदतीचा हात देण्याची संस्कृती आहे, मग ती मदत आर्थिक असो की वस्तू रुपात की श्रमदान असो. पाडळी येथील तात्या भांडवले यांच्या गुरांच्या गोठ्यास आग लागून जनावरांचा मृत्यू झाला होता. होत्याचे नव्हते झाले. याच गावातील वसंत पाटील कुटुंबीयांनी देशी गाईचे खोंड गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देऊन या कुटुंबाला आधार दिला.
तात्यासाहेब याच्या गोठ्यास आग लागून सहा जनावरे, कोंबड्या, शेळ्या यांचा मृत्यू झाला तर शेती औजारे, संसारउपयोगी साहित्य आदी जाळून गेले. अनेकांनी या कुटुंबाला आर्थिक मदत केली. मात्र पाडळी येथील वसंत पाटील यांच्या पत्नी वंदना, मुले इंजिनिअर चंद्रकांत, पोलीस संतोष, निवृत्त आर्मी इन्स्पेक्टर अमृतराव या कुटुंबानी या भांडवले कुटुंबाला ६ महिन्याचे पाडे दिले. यावेळी भीमराव पाटील, आदीकराव पाटील , सागरपाटील , प्रशांत पाटील , जगन्नाथ पाटील , लक्ष्मण पाटील उपस्थित होते.
दि.१२ रोजी सित्तुरवरून खरेदीसाठी लोक आले, मात्र त्यांनी हे पाडे विकले नाही. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी भांडवले कुटुंबाला पाडे देण्याचे ठरवले होते आणि आजच त्यांच्या घरी नातीचा जन्म झाला. त्यामुळे भांडवले यांना मदत करून त्यांनी आपली माणुसकीची परंपरा जपली. तात्यासाहेब यास बैलगाडी शर्यतीचा नाद आहे.त्यांना आज देशी गाईचे खोंड दिल्याने तात्या व त्यांचे कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.
या अगोदरही दि.१५ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या पहिल्या नातवाच्या बारश्याचा खर्च टाळून शहीद कुंडलिक केरबा माने कुटुंबियांना २० हजार रुपये मदत केली होती. गेल्या सात वर्षांपासून पाडळी हे गाव फटाकेमुक्त केले. माजी सैनिकांचा मेळावा व सत्कार केला. पाडळी जिल्हा परिषद शाळेस २५ हजार रुपयांची मदत तसेच पुस्तके वाटप, मूक बधिर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्याबरोबर घरच्या मुलांचे वाढदिवस साजरा केला जातो. तालुक्यातील शहीद जवानांच्या वीरमाता यांचा सत्कार , महाड येथील देवदूत बसंत कुमार यांचा सत्कार व मदत असे अनेक सामाजिक कार्य व मदतीचा हात दिला आहे. पाडळी येथील वसंत पाटील यांच्या घरी एक नातू १५ ऑगस्ट दिवशी तर एक नात गुढी पाडव्या दिवशी जन्मलेली आहेत.