लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेपूर (ता. कडेगाव)जवळ कारने अचानक पेट घेऊन ती पूर्ण जळून खाकझाली. यात सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्येकोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे कडेगाव पोलिसांनी सांगितले. गोरेगाव(मुंबई) येथील बालाजी सुरेशबाबू तेवेन्द्रिया यांनी याबाबत कडेगावपोलिसात वर्दी दिली आहे.
शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास बालाजी तेवेन्द्रिया हे नांदोशी (ता.खटाव) हून कडेपूर मार्गे वडियेरायबाग (ता. कडेगाव) कडे कार (क्र. एमएच ४७एन ६०१०) ने आपल्या ४ मित्रांसमवेत चालले होते. ३ वाजून १० मिनिटांनी तेकडेपूरजवळ कालव्यालगत आल्यावर बॉनेटच्या खालून धूर येऊ लागला. इंजिननेअचानक पेट घेतला होता. तात्काळ सर्वजण गाडीतून बाहेर पडल्यावर काहीवेळातच कार पूर्ण जळून खाक झाली.
यावेळी प्रसंगावधान राखल्याने गाडीतीलसर्वजण बचावले. याबाबत कडेगाव पोलिसांत नोंद केली असून पोलिस अधिक तपासकरीत आहेत.