जातीवरून हिणवणे ही हिंसाच- नागराज मंजुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 04:30 AM2020-03-03T04:30:19+5:302020-03-03T04:30:30+5:30

आपण सर्व जात संपवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ती संपत नाही. जातीवरून हिणवणे ही हिंसाच आहे.

cast is from violence - Nagraj Manjule | जातीवरून हिणवणे ही हिंसाच- नागराज मंजुळे

जातीवरून हिणवणे ही हिंसाच- नागराज मंजुळे

googlenewsNext

वाटेगाव (जि.सांगली) : आपण सर्व जात संपवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ती संपत नाही. जातीवरून हिणवणे ही हिंसाच आहे. देशात जोपर्यंत जातिवाद संपत नाही, तोपर्यंत अण्णाभाऊ साठेंना अभिप्रेत असलेला समाज निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोमवारी केले.
वाटेगाव (ता. वाळवा) येथे सत्यशोधक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरवलेल्या ३१ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. विठ्ठल वाघ, नागराज मंजुळे, डॉ. बाबूराव गुरव, प्रा. चंद्रकुमार नलगे, डॉ. माया पंडित-नारकर, दिग्दर्शक विवेक वाघ, कार्याध्यक्ष रवींद्र बर्डे, स्वागताध्यक्ष मच्छिंद्र सकटे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे यांच्याहस्ते झाले. नागराज मंजुळे म्हणाले, शहरांपासून दूर वाटेगावसारख्या गावात साहित्य संमेलन भरवले जाते, हे फार महत्त्वाचे आहे. अशी साहित्य संमेलने गावागावात व्हावीत. इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात वाचन बंद झाले आहे. यामुळे वाचन संस्कृतीस या संमेलनातून बळ मिळेल.
कविता हाच मला नेहमी माज्या दु:खावरचा रामबाण उपाय वाटला आहे. तिच्यामुळेच एक आउटलेट मिळतो आणि म्हणून जगण्या मरण्याला कवितेशिवाय अन्य पर्याय नसतो, असं मला वाटतं.जातीवरून हिणवणे ही हिंसाच आहे. देशात जोपर्यंत जातिवाद संपत नाही, कवी विठ्ठल वाघ म्हणाले की, मी शाहू, फुले, आंबेडकर व अण्णा भाऊ यांचे लेकरू आहे. माझी वाणी अण्णा भाऊंची आहे. ते जाती, धर्माच्या पलीकडचा माणूस होते.
माया पंडित म्हणाल्या , धर्माच्या नावाखाली हिंचाचार करणाऱ्या लोकांशी आपली बांधिलकी नसून, ती अण्णा भाऊंच्या साहित्याशी व विचारांशी आहे.

Web Title: cast is from violence - Nagraj Manjule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.