इस्लामपुरात महिला राष्ट्रवादीतर्फे केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:26 AM2021-03-06T04:26:03+5:302021-03-06T04:26:03+5:30
इस्लामपूर येथे गॅस दर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी चुलीवर जेवण केले. यावेळी शहराध्यक्षा रोझा किणीकर आणि कार्यकर्त्या उपस्थित ...
इस्लामपूर येथे गॅस दर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी चुलीवर जेवण केले. यावेळी शहराध्यक्षा रोझा किणीकर आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर येथे चुलीवर जेवण करून केंद्र शासनाच्या गॅस दरवाढीचा आगळ्या-वेगळ्या पध्दतीने निषेध केला. यावेळी त्यांनी पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल, डिझेल दरवाढीचाही निषेध केला.
महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा रोझा किणीकर यांच्या नेतृत्वाखाली गॅस आणि इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार व नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. किणीकर म्हणाल्या, गॅस सिलिंडर एक हजारच्याजवळ आला आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती दुप्पट,तिप्पट झाल्या आहेत. आम्ही केंद्र सरकारचा तीव्र निषेध करतो. त्यांनी या किमती तातडीने कमी कराव्यात.
या आंदोलनात उपाध्यक्षा मालन वाकळे,योगिता माळी,मनिषा पेठकर, सुनंदा साठे, कुसुमताई जाधव, प्रतिभा पाटील,गीता पाटील, प्रियांका साळुंखे, मनाली वडार,ऋतुजा देसाई, श्रद्धा चव्हाण उपस्थित होत्या.