ओबीसी महामेळावा जनजागृतीसाठी रथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:50 AM2021-02-21T04:50:15+5:302021-02-21T04:50:15+5:30
सांगली : ओबीसी समाजाच्यावतीने गुरुवार, दि. २५ रोजी सांगलीत सकल ओबीसी महामेळावा आयोजित केला आहे. त्यानिमित्त जनजागृती रथाचे उद्घाटन ...
सांगली : ओबीसी समाजाच्यावतीने गुरुवार, दि. २५ रोजी सांगलीत सकल ओबीसी महामेळावा आयोजित केला आहे. त्यानिमित्त जनजागृती रथाचे उद्घाटन शनिवारी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाले. जिल्ह्यातील प्रमुख गावांतून रथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
स्वागताध्यक्ष अरुण खरमाटे म्हणाले, मेळाव्यास ओबीसी समाजाचे मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, लक्ष्मण वडले, माजी आमदार शरद पाटील उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बाळासाहेब गुरव, जिल्हाध्यक्ष सुनील गुरव, उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड, कार्याध्यक्ष दीपक सुतार, अर्चना सुतार, कैलास स्वामी, एकनाथ सूर्यवंशी, आनंदराव वाघमोडे, नंदकुमार निळकंठ, धनपाल माळी, शरद झेंडे, प्रा. लक्ष्मण हाके उपस्थित होते. दोन्ही कोळी समाज संघटनांनी उपस्थित राहू, असे स्पष्ट केले.
चौकट
सकल ओबीसी मेळावा यशस्वी करू : सुनील गुरव
जिल्हाध्यक्ष सुनील गुरव म्हणाले, शासनाकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ओबीसींच्या आरक्षणावर मर्यादा येणार आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.