लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ड्रेनेजच्या कामामुळे पंचशीलनगरमध्ये खराब झालेल्या रस्त्यावर दररोज अपघात होत असल्याबद्दल शहर सुधार समितीच्या वतीने तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेत ड्रेनेज अभियंत्यांनी पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले.
सुधार समितीचे शहर अध्यक्ष महालिंग हेगडे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, प्रभाग क्र. ११ आणि १२ मध्ये गेली दोन वर्षे ड्रेनेजचे काम सुरू आहे. जुना बुधगाव रोड, पंचशीलनगर हा रस्ता साठ फुटी असताना या ठिकाणी फक्त दोन-अडीच मीटरचा रस्ता करण्याचे गैरसोयीचे होईल. त्यामुळे परिस्थिती अजून बिकट होऊ शकते. वाहतुकीस पुन्हा अडथळा होईल. पावसामुळे या रस्त्यावर रोज ३ ते ४ अपघात ठरल्याप्रमाणे होत आहेत. त्यामुळे प्रभाग क्र. १२ आणि परिसरातील ड्रेनेजमुळे बाधित झालेले रस्ते हे पूर्ण रुंदीने करावेत.
महापालिका आयुक्तांच्या ही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे तत्काळ ड्रेनेज अभियंता परशुराम हलकुडे यांनी पाहणी केली आणि लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी बबन शिंदे, सचिन माळी, अमोल माळी, शांताराम माळी, अमोल माळी, बाळासाहेब माळी, प्राणिमित्र अजित काशीद, रमेश डफळापुरे, बापू कोळेकर, अनुकल्प केंगार, महेश शिंदे आदी उपस्थित होते.