बुधगावमधील सरपंचांच्या मनमानीप्रकरणी गुडेवारांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:18 AM2021-06-17T04:18:58+5:302021-06-17T04:18:58+5:30
बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील खासगी कंपनीच्या केबल खोदाईचे प्रकरण चांगलेच लांबणार असल्याचे दिसत आहे. सरपंच सुरेश ओंकारे ...
बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील खासगी कंपनीच्या केबल खोदाईचे प्रकरण चांगलेच लांबणार असल्याचे दिसत आहे. सरपंच सुरेश ओंकारे यांच्या मनमानी कारभारामुळे सरपंच आणि सदस्यांमध्ये वाद रंगला आहे. हा वाद आता जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे जाणार आहे.
सरपंचांच्या या नियमबाह्य कामाची तक्रार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुडेवार यांच्याकडे जाणार आहे. केबल टाकणाऱ्या कंपनीने सुरुवातीला नियमानुसार कामाचा आराखडा ग्रामपंचायतीकडे सादर केलेले नाही. ग्रामपंचायतीला वर्ग केलेली रक्कम अंदाजे दिली आहे, असा आरोप हणमंत कदम, अनिल आवळे, रफिक हवालदार यांनी केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांना अंधारात ठेवून झालेल्या या कारभाराची तक्रार गुडेवार यांच्याकडे जाणार आहे. तसेच केबल खोदाईसाठीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.