राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या जनजागृतीसाठी कार्यशाळा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 04:04 PM2020-03-07T16:04:32+5:302020-03-07T16:08:41+5:30
असंघटीत कामगारांकरीता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापाऱ्याकरीता राष्ट्रीय निवृत्ती योजना या दोन योजनांच्या जनजागृतीसाठी दिनांक 5 मार्च 2020 रोजी उद्योग भवन सभागृह, विश्रामबाग, सांगली येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सांगली : असंघटीत कामगारांकरीता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापाऱ्याकरीता राष्ट्रीय निवृत्ती योजना या दोन योजनांच्या जनजागृतीसाठी दिनांक 5 मार्च 2020 रोजी उद्योग भवन सभागृह, विश्रामबाग, सांगली येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सरकारी कामगार अधिकारी मो. व. सोनार यांनी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमन, 2017 या बाबत सविस्तर माहिती दिली. या मध्ये हा कायदा शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात लागू केला असून आस्थापनांची नोंदणी, आस्थापना उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा, कर्मचाऱ्यांचे कामाचे तास, अतिकालीक कामाचे वेतन, साप्ताहिक सुट्टी, सुविधाकराचे कामकाज, आस्थापना कर्मचारी इत्यादी महात्वाच्या व्याख्या, आस्थापना नोंदणी व नुतनीकरण या बाबतची कार्यपध्दती, वेतनासह आठ दिवस नैमितिक रजा, राष्ट्रीय सणाच्या चार सुट्या मालक व कर्मचारी यांमध्ये मान्य झालेल्या चार सुट्या याबाबतीत सविस्तर माहिती सर्व उपस्थितांना दिली.
कर्मचारी यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी उपाययोजना, कल्याणकारी तरतुदी, आस्थापनेच्या मालकांने सादर करावयाचे वार्षिक विवरण पत्र, अपराधाबाबत शास्ती, कलम झ्र 33 नुसार अपराध आपसात मिठविणची तरतुद, नियम 2018 नुसार विहित केले अर्जाचे नमुने, नियम 35 नुसार आस्थापनेचा नामफलक मराठा देवनागरी लिपीत प्रदर्शित करणे व ज्या आस्थापनेत काणत्याही प्रकारचे मद्य विक्री, मद्यपान सेवा दिली जात असेल अशा अस्थापनेला महापुरुषांची/गडकिल्यांची नांवे देण्यात येऊ नयेत इत्यादी माहिती देऊन प्रमाणपत्र नोंदणी, नुतनीकरण, बदल या करीता ्रे२.ेंँंङ्मल्ल’्रल्ल.ॅङ्म५.्रल्ल तसेच शासनाचे आपले सरकार या संकेतस्थळाचा उपयोग करावा याबाबतीत सविस्तर माहिती सर्व उपस्थितांना दिली व उपस्थितांच्या शंकाचे निरसन केले.
यावेळी सरकारी कामगार अधिकारी, व प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त, इचलकरंजी श्रीमती जानकी भोईटे, प्रभारी सुविधाकार जयश्री मगदूम, किरकोळ किराणा भुसार विक्रेता संघाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.