सांगली शहर पोलीस ठाण्यात माजी महापौरांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 01:44 PM2020-07-26T13:44:02+5:302020-07-26T13:53:10+5:30
माजी महापौर व विद्यमान नगरेसेवक हारूण शिकलगार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री चांगलाच गोंधळ घातला.
सांगली : माजी महापौर व विद्यमान नगरेसेवक हारूण शिकलगार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री चांगलाच गोंधळ घातला.
संचारबंदी असताना काहीजण आरडा ओरडा करत थांबल्याने पोलीस तिथे आले होते. त्यानंतर झालेल्या वादावादीनंतर हा प्रकार घडला.
सांगलीत सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने सायंकाळी सात ते पाचपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शनिवारी रात्री शहर पोलिसांनी स्टेशन चौकात नाकाबंदी केली होती.
रात्री साडेआठच्या सुमारास या परिसरात आरडा ओरडा झाल्याने पोलीस तिथे आले. यावेळी माजी महापौर शिकलगार तिथे होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांना तिथून जाण्यास सांगितले. नंतर शिकलगारही पोलीस ठाण्यात आले.
यावेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांशीही त्यांची वादावादी झाली. त्यामुळे शिकलगार यांच्यासह अन्य एकाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संतोष कुडचे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.