बोरगाव : ताकारी (ता. वाळवा) येथे कोरोना रूग्णांसाठी सर्व सोयींनीयुक्त कोविड विलगीकरण कक्षाची शुक्रवारी उभारणी करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेत हे सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोना रूग्ण व त्यांचे नातेवाईकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती सदस्य रूपाली सपाटे यांनी केले आहे.
सपाटे म्हणाल्या की, ज्या कुटुंबातील व्यक्ती बाधित होईल, त्या कुटुंबातील सर्वांनी किमान चार दिवस घराबाहेर पडू नये व कुटुंबातील सर्वांनी तपासणी करावी. ज्यावेळी सर्व कुटुंब निगेटिव्ह असल्याची खात्री होईल, त्याचवेळी बाहेर पडावे. यामुळे संपर्कात आलेले लोक बाधित होणार नाहीत.
यावेळी सरपंच अर्जुन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजश्री कुंभार, प्रकाश सपाटे, ए. एम. पाटील, ए. टी. शिकलगार, सागर अडसुळे, अमोल बोगर उपस्थित होते.