फोटो : मिरज येथे केंद्रीय जीएसटीचे सहाय्यक आयुक्त किशोर गोहिल यांच्या हस्ते महेश ठाणेदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र मेढेकर, उमेश माळी, श्रेयस शहा, राजेश भाटे उपस्थित होते.
मिरज : जीएसटी अंमलबजावणीत सांगली जिल्ह्यातील चार्टर्ड अकाउण्टण्टस्चे महत्त्वाचे योगदान असून, त्यांच्या सक्रिय सहभागामुळे जीएसटी स्थिरावत असल्याचे प्रतिपादन सांगली केंद्रीय जीएसटीचे सहाय्यक आयुक्त किशोर गोहिल यांनी केले.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउण्टण्ट्स ऑफ इंडियाच्या सांगली शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. सांगली शाखेचे नूतन अध्यक्ष महेश ठाणेदार, उपाध्यक्ष उमेश माळी, सचिव श्रेयस शहा, राजेश भाटे, केंद्रीय जीएसटीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर, अभिजित वाघमोडे उपस्थित होते.
किशोर गोहिल म्हणाले, जीएसटी अंमलबजावणीला आता चार वर्षे होत असून, तो स्थिरावत आहे. सांगली जिल्ह्यात चार्टर्ड अकाउण्टण्ट्स संघटनेने विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. यापुढेही महसूल भरणा यासह विविध बाबींसाठी सहकार्य अपेक्षित आहे.